डॉ. ऋचा रुपनर आत्महत्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. ऋचा रुपनर यांनी कौटुंबिक छळाला आणि हिंसाचाराला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. पती सूरजने केलेल्या छळाला कंटाळून हे टोकाचं पाऊल ऋचा रुपनर यांनी उचललं. ज्यानंतर या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. तसंच ऋचा यांना न्याय मिळावा म्हणून पंढरपूरच्या डॉक्टरांनी आंदोलनही केलं.

काय आहे प्रकरण?

सांगोल्यातील ज्येष्ठ उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांच्या सून असलेल्या डॉ. ऋचा सूरज रूपनर (वय ३५) यांनी सांगोल्यात फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसाहतीत स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या आपले पती डॉ. सूरज रूपनर यांच्या सोबत पंढरपुरात फॅबटेक हॉस्पिटल चालवत होत्या. डॉ. ऋचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील (रा. पंढरपूर) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत डॉ. ऋचा आणि डॉ. सूरज यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. मात्र डॉ. सूरज हा व्यभिचारी होता. आपल्या रूग्णालयात त्यास एमआरआय मशिन खरेदी करायची होती. त्यासाठी तो पत्नी डॉ. ऋचा हिच्या मालकीहक्काची असलेली पंढरपुरातील जमीन गहाणखत करून बँककर्ज काढावे किंवा माहेरातून तेवढी रक्कम आणावी म्हणून लकडा लावत असे. या सगळ्याला कंटाळून ऋचा रुपनर यांनी आत्महत्या केली.

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
female doctor suicide
डॉक्टर महिलेची विष प्राशन करून आत्महत्या
marathi actress Kranti Redkar told the story of her girl
Video: “जर तू मेलीस तर मी…”; लेकीच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने क्रांती रेडकरला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “तीन फुटांची पण नाहीये…”
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
Mukesh Ambani invited to Marathi actor Shreyas Raje on him son Anant Ambani wedding
मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”
genelia deshmukh celebrated ashadi ekadashi in latur
वरईचा भात, साबुदाणा खिचडी अन्…; देशमुखांच्या घरी आषाढी एकादशीचा उत्साह! जिनिलीयाने लातूरमधून शेअर केला व्हिडीओ
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Richa Chadha answered to those who trolled Deepika Padukone for wearing high heels during pregnancy
“गर्भाशय नाही तर…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढा स्पष्टच म्हणाली…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलंय?

सोलापूरमध्ये पती डॉ.सूरज रुपनर यांच्याकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला, मानसिक त्रासाला कंटाळून डॉ.ऋचा पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना माध्यमातून समोर आल्यानंतर काल मी पोलीस निरीक्षकांशी फोनवर चर्चा केली होती. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांच्या शोध पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना काल केल्या होत्या.त्यानुसार कारवाई होत आज सकाळी आरोपी पती आणि सासरे यांना अटक करण्यात आली आहे. आता यापुढील तपास जलदगतीने करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक,सोलापूर यांना देण्यात आले आहेत. सुशिक्षित कुटुंबातील, रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या आरोपी व्यक्तीचे असे वर्तन अत्यंत निंदनीय आहे. डॉ.ऋचा पाटील पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग पाठपुरावा करेल. असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

सांगोल्यातले डॉक्टर आक्रमक

डॉक्टर ऋचा सूरज रुपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवार ६ जून रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून समाज माध्यमांवर संतप्त पडसाद उमटत आहेत. या प्रकाणातील आरोपी सूरज रुपनर यास अटक करण्यात पोलीस उशीर करीत आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. काल पंढरपुरातील डॉक्टर्सनी एकत्र येत सांगोला पोलीस ठाण्यात ठिय्या देत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते. तर आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे पंढरपुरात प्रशासकीय बैठकीसाठी आले असता डॉक्टर्स संघटनांनी एकत्र येत त्यांना निवेदन दिले. आरोपी सूरज रुपनर याला तातडीने अटक करण्यात यावी तसेच मयत डॉक्टर ऋचा पाटील -रुपनर यांची सुसाईड नोट अजून मिळाली नाही,पोलिसांवर राजकीय दबाव असू शकतो,सदर घटनेचा तपास सांगोला पोलीस निरीक्षकाकडून काढून घेत सीआयडी कडे सोपवावा अशी मागणी यावेळी आय एम ए या संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.