दोन मुलांना फाशी देऊन महिलेने केली आत्महत्या

महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नोटबंदीच्या निर्णयानंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील तळेगाव बोरी येथे एका महिलेने तिच्या दोन चिमूरड्यांना फाशी देऊन स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी येथे संजीवनी गाडेकर ही महिला तिच्या दोन मुल आणि पतीसह राहत होती. बुधवारी संध्याकाळी चार वर्षांचा राजवीर आणि सहा वर्षांची छकूलाी या दोघा लहान मुलांना तिने फाशी दिली. यानंतर स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. महिलेचा पती हा वाहनचालक असून आत्महत्येच्या वेळी तो घरात नव्हता. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women committed suicide in latur