सांगली : बदलत्या काळात स्त्री मिळवती झाली पण ठरवती झाली आहे का असा सवाल साहित्य अकादमी प्राप्त लेखिका सोनाली नवांगुळ यांनी उपस्थित केला. आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्यावतीने चौथे राज्यस्तरिय  साहित्य संमेलन मिरजेत संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्रीमती नवांगुळ बोलत होत्या. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले, स्त्रियांनी सक्षम होणे गरजेचे आहे. धार्मिक आस्था असायला हवी पण त्याचे स्तोम माजवू नये, प्रत्येकाने डिजिटल साक्षर असले पाहिजे.

 संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. जेष्ठ लेखिका निर्मला लोंढे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. उद्घाटन डॉ. जयश्री पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्षा उषा चांदूरकर म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही ती समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. बोली भाषेतून साहित्य निर्मिती करणे गरजेचे आहे.

प्रमुख पाहुण्या डॉ. छाया महाजन यांनी साहित्य संमेलनाचा हेतू काय? मराठी भाषेत वाचकांचे स्थान कय आहे? अशा मूलभूत प्रशांचा मागोवा घेत प्रत्येकाने स्वत।ची आस्वाद घेण्याची क्षमता काय आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. साहित्य माणसाच्या वेदना बाहेर काढण्यास मदत करते परंतु भाषा संवर्धन करताना माणूसपण जपले पाहिजे. विशेष अतिथी म्हणून उद्योजिका भूमी मगदूम उपस्थित होत्या.

संमेलन सुरुवातीस सांगली जिल्हाध्यक्षा व प.महाराष्ट्र प्रमुख मा. मनिषा रायजादे व राज्याध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांनी सर्वांचे स्वागत केले. जस्मिन शेख यांनी उद्घाटन सत्राची सुरवात करून दिली तर डॉ. स्वाती पाटील व मनीषा पाटील हरोलीकर यांनी सूत्रसंचालन केले.

दुपारच्या सत्रात डॉ..तारा भवाळकर यांची प्रकट मुलाखत झाली. त्यांनी स्त्री व त्यांच्या सीतायन वर बोलल्या. नवोदित लेखिकांना मार्गदर्शन केले

डॉ राजश्री पाटील डॉ  स्मिता पाटील यांनी मुलाखत घेतली. संमेलनात पुस्तक प्रकाशन  गझल मुशायरा, कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन व संस्कृती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले .या संमेलनासाठी राज्यभरातून २५० हून अधिक महिला उपस्थित होत्या.