जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना महिलेनं अडवलं, सर्वांसमोर पोलिसांच्या अन्यायाविरोधात तक्रार

जालन्यात एका महिलेनं पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच अडवल्याचा प्रकार घडला.

जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना महिलेनं अडवलं, सर्वांसमोर पोलिसांच्या अन्यायाविरोधात तक्रार
अब्दुल सत्तार

जालन्यात एका महिलेनं पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच अडवल्याचा प्रकार घडला. अॅड. रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे. शहरात एका दाम्पत्याचं स्टेशनरीचं दुकान होतं. ते दुकान रिकामं करण्यासाठी घर मालकानं पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला १५ लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केला, असा आरोप महिलेनं केलाय.

उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. या प्रकरणात या महिलेनं झेंडावंदन संपल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना अडवलं. दरम्यान या प्रकरणात चौकशी करण्यात येईल असं सत्तार यांनी म्हटलंय.

“जालन्यात काळोख पसरला आहे”

अॅड रिमा खरात काळे म्हणाल्या, “आम्ही कृषीमंत्र्यांना अडवलं कारण, जालन्यात काळोख पसरला आहे आणि या काळोखावर मात करण्यासाठी आम्ही त्यांना कंदील देऊन उजेडाची जाणीव करून देणार होतो. मात्र, आमचा कंदील जप्त करण्यात आला. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला तिरंगा ध्वज भेट देण्यासाठी आणला. आज देशात स्वातंत्र्य असलं तरी आम्ही पारतंत्र्य अनुभवत आहोत.”

व्हिडीओ पाहा :

“इथं अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. खाकी गुंडागर्दीची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. केवळ लोकांचे टायपिंगचे खर्च होतात. अर्जावर अर्ज दिले जातात. मात्र, अर्जांचा निपटारा होत नाही. खाकी वर्दीसाठी वेगळा कायदा आणि जनसामान्यांसाठी वेगळा कायदा आहे,” असा आरोप रिमा खरात काळे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women stop agriculture minister abdul sattar in jalna to complaint against police rno news pbs

Next Story
Petrol-Diesel Price on 15 August 2022: आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी