scorecardresearch

महिला दिन विशेष : त्या दोघींनी घेतला पोलीस अधिक्षक पदाचा अनुभव

सिमरन घातानी आणि देवश्री निगडे या दोन मुलींनी पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीत बसून या पदाची अनुभूती घेतली.

Womens Day Special They got experience as Superintendent of Police

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोन मुलींनी रायगड पोलीस अधिक्षक पदाचा अनुभव घेतला. पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सिमरन घातानी आणि देवश्री निगडे या दोन मुलींनी पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीत बसून या पदाची अनुभूती घेतली.

 देवश्री निगडे हिला दुर्धर आजाराने ग्रासली होती. तर सिमरन घातानी ही अपघातातून थोडक्यात बचावली होती. या दोन्ही मुलींचे मनोबल उंचावण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधिक्षकांच्या गाडीतून दोघींनाही सन्मानाने कार्यालयात आणण्यात आले. यावेळी त्यांना सशस्त्र पोलीसांनी सलामी दिली. पोलीस अधिक्षक दुधे यांनी दोघींचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दोघींनाही पोलीस अधिक्षकांच्या दालनात नेण्यात आले. त्यांच्या खुर्चीत बसून दोघींनीही पोलीस अधिक्षकांच्या पदाचा अनुभव घेतला. पोलीस कन्ट्रोल रुमशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तर वायरलेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील पोलीसांना संदेशही पाठविला.

  यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागेचे प्रमुख दयानंद गावडे हे देखील उपस्थित होते. दोघांनीही या मुलींशी संवाद साधून पोलीस दलाच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. या अनुभवामुळे दोन्ही मुली आणि त्यांचे पालकही गहीवरून गेले होते. दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसून येत होता.  

 आजारपणातून बऱ्या होणाऱ्या या दोन्ही मुलींचे मनोबल उंचवावे, तसेच मुलांमध्ये शासकीय सेवेत येण्याचे इच्छा निर्माण व्हावी हा या उपक्रमाच्या मागचा मूळ उद्देश असल्याचे यावेळी पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी सांगीतले. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यात आज महिला दिना निमित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Womens day special they got experience as superintendent of police abn

ताज्या बातम्या