जळगाव – आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी हवी असेल, तर कार्यकर्त्यांची नोंदणी आवश्यक असल्याचे खडे बोल सुनावत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षाचा आढावा घेतला.

आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी जिल्ह्यात आले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील आकाशवाणी चौकातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण भागांतील तरुणांचा राष्ट्रवादीकडे अधिक ओघ आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
DCM Ajit Pawar On NCP Workers
“मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अन्यथा…”; अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी
gopal shetty poonam mahajan absent from bjp meeting
Lok Sabha Election 2024 : बैठकीला गोपाळ शेट्टी, पूनम महाजन गैरहजर; भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा
shivraj patil chakurkar, Dr archana patil chakurkar, latur, amit deshmukh, congress, bjp
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी

आमदार एकनाथ खडसे यांनी आगामी निवडणुकांतील यशासाठी प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी संवाद यात्रा काढण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुक्ताईनगर मतदारसंघात पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी काढलेल्या परिवार संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्याचे खडसेंनी सुचविले. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश प्रवक्ते अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत आगामी निवडणुकांत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, अशी ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आढावा सादर केला. व्यासपीठावर पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. सतीश पाटील तसेच संतोष चौधरी, साहेबराव पाटील, मनीष जैन, राजीव देशमुख, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, अरुण पाटील या माजी आमदारांसह पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे- खेवलकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरम्ी, शहराध्यक्षा मंगला पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. मूळचे शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्यांच्यासोबत आहोत. पुढील निवडणुकीसाठी पक्षाने मेहनत करून प्रचार तर करावयाचा आहे; पण निवडणुकीच्या काळात पन्नास खोके एकदम ओके लिहिलेले १० हजार टी शर्ट छापून ते मतदारसंघात वाटावेत. असे झाल्यास जिल्ह्यातील शिंदे यांच्यासोबत गेलेले पाचही आमदार पराभूत होतील आणि या पाचही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

बिल्किस बानो न्यायासाठी राष्ट्रवादीची निदर्शने

गुजरातमधील बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपींना सोडणे चुकीचे असल्याचा आरोप करीत शनिवारी  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करून त्याचा निषेध करण्यात आला. पक्षाच्या शहरातील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महागराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.