राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणांचा खरपूस समाचार घेतलाय. मोदींना केवळ संघाच्या शाखेत शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच मोदींनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होऊ नये, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या २ दिवसंपासून संसदेत ज्या भाषेत आणि जशा देहबोलीत बोलत आहेत, ते अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा भाषेत अशा देहबोलीसह बोलणं शोभत नाही. या देशाला इतिहास आहे. हा इतिहास तोडण्याची मोडण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदींना संघाच्या शाखेत जे शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे. त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं कुलगुरू होऊ नये.”

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

“पंतप्रधान मोदी जे जे बोलत आहेत ते द्वेषापोटी बोलत आहेत”

“या देशाचा एक इतिहास आहे आणि संसदेची एक गरीमा आहे. त्यांनी ते सगळं सांभाळावं. जे काही वाईट झालं ते काँग्रेसमुळे झालं आणि जे काही चांगलं झालं ते फक्त मागील ७ वर्षातच झालं असं ते सांगत आहेत. पीएसयू मागील ७ वर्षात विकले गेले, पण त्याआधी ते निर्माण करण्यात आले. त्याबद्दल मोदींना काहीही चांगुलपणा नाही. पंतप्रधान मोदी जे जे बोलत आहेत ते द्वेषापोटी बोलत आहेत. त्यांच्या देहबोलीतून हे दिसून येतं. ते अत्यंत नैराश्यात गेले आहेत,” असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

“निवडणूक जिंकण्यासाठी मोदी खालच्या दर्जावर गेले”

“मोदींना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते कितीही खालच्या दर्जावर गेले तरी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ते चालतं. या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करते,” असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

“नेहरूंना प्रतिमा राखण्यासाठी आत्तासारखी ‘नौटंकी’ करावी लागली नाही”

यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, “गोवा मुक्तिसंग्रामाबाबत इतिहासात सर्व लिहिलं गेलंय. नेहरू पंतप्रधान असताना अनेक परिश्रम घेण्यात आले. ते देशाचे पहिले पंतप्रधान तर होतेच सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते होते. त्यांना त्यांची प्रतिमा राखण्यासाठी आत्तासारखी ‘नौटंकी’ कधीच करायला लागली नाही. आमची पंतप्रधानांना एकच विनंती आहे की त्या पदाची प्रतिष्ठा राखा. इतिहास काय आहे हे जाणून घ्या आणि मग बोला.”

हेही वाचा : “मोदींनी चहा विकला ते रेल्वे स्टेशन…” मोदींच्या राज्यसभेतील भाषणावर कपिल सिब्बल यांचं प्रत्युत्तर

“कोविड आलं तर काँग्रेसमुळे आलं आणि गेलं तर मोदींमुळे गेलं का? गंगा नदीत संपूर्ण देश आणि जगाने प्रेतं वाहताना बघितली. त्यामुळे आपल्याला मान खाली घालावी लागली. या सर्व गोष्टी होता कामा नयेत,” असंही ठाकूर यांनी नमूद केलं.