राज्यात अलिकडच्या काळात लहान-मोठ्या दंगली घडत आहेत. गेल्या महिन्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये, अकोल्यात दंगली घडल्या. त्यापाठोपाठ या महिन्यात दोन दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये एका उरूसाच्या मिरवणुकीत काही तरुणांनी मुघल बादशाह औरंगजेबाचे पोस्टर्स हातात घेऊन नाच केला, तसेच घोषणाबाजी देखील केली. त्यापाठोपाठ कोल्हापुरातही असाच काहिसा प्रकार घडला. काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टेटसवर ठेवले, तसेच औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारा मजकूरही शेअर केल्याने या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्त्ववादी संघटनांनी केली. या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. कोल्हापुरात हिंदुत्त्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलनही केलं. परंतु काही ठिकाणी आंदोलन हिंसक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या सर्व घटनांवरून राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ
हे ही वाचा >> “…मस्तवाल मुलाचा बाप”, केंद्रीय मंत्र्याच्या शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर
यानंतर आता काँग्रेसने या घटनांसाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरलं आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.