scorecardresearch

यवतमाळमध्ये कार्यालयातच वीज वितरण कर्मचाऱ्यांची ओली पार्टी! व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वीज वितरण कार्यालयातच भर दुपारी ओली पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

यवतमाळमध्ये कार्यालयातच वीज वितरण कर्मचाऱ्यांची ओली पार्टी! व्हिडीओ व्हायरल
सांकेतिक फोटो

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वीज वितरण कार्यालयातच भर दुपारी ओली पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी कार्यालयातील टेबलवर बसून दारू पिताना दिसत आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील एका वीज कार्यालयाच्या उपकेंद्रावर कर्मचारी मद्यप्राशन करत होते. कार्यालयाच्या टेबलवरच या कर्मचाऱ्यांची पार्टी रंगली होती. मात्र अभियंत्याने कार्यालयास अचानकपणे भेट देत हा सर्व प्रकार उघडकीस आणला. अभियंत्याने कर्मचाऱ्यांना वीजबिलाची वसुली करण्याचे सोडून दुपारी कार्यालयात काय करत आहात? ऑफिसमध्ये मद्यप्राशन करता का? अशा प्रकारचे प्रश्न विचारले. मात्र मद्यप्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.

हेही वाचा >> ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र आक्रमक, म्हणाले “…तोपर्यंत कोणी केसालाही धक्का लावू शकणार नाही”

दरम्यान, अभियंत्याने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर साधारण एका महिन्यानंतर हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मद्यप्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 22:36 IST

संबंधित बातम्या