यवतामळमधील उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास उमरखेडवरुन ही एसटी बस पुसद येथे जात असताना ही घटना घडली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. याच नाल्यावरून एसटीचालकाने ही बस नेल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरखेड पुसद मार्गावरील दहागाव येथील नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी वाहत होते. अशातही एसटी चालकाने बस पुढे नेली त्यामुळे ती पुराच्या पाण्यात बुडाली. बसमध्ये चालकासह सहा प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांना दोन प्रवाशाला वाचवण्यात यश आले आहे तर एका प्रवाशाचा मृत्य झाला आहे. इतर प्रवाशांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

या एसटीमध्ये एकूण सहा लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तहसीलदार आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुराच्या पाण्यातून वाहने घेऊन न जाण्याचे आवाहन करण्यात आले असतानाही एसटी चालकाने अतिधाडस दाखवत बस पाण्यात नेली. मात्र नाल्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने बस पाण्यासोबत वाहून गेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal st bus washed away in flood waters abn
First published on: 28-09-2021 at 09:23 IST