कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी गुरुवारी योगेशकुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे येथे बदली झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक पदावर नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू होणार आहेत. मे २०२३ मध्ये महेंद्र पंडित हे येथे रुजू झाले होते.