उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी गावात लग्नाच्या मांडवातून मुलीची अंतयात्रा काढण्याची वेळ एका कुटुंबियांवर आली. बेंबळ गावातील मनिषा गावडे या मुलीचे लग्न ठरले होते. मात्र, हळदीच्या दिवशीच घराच्या अंगणात उभी असताना जुन्या पिलर डोक्यात कोसळून ती गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेनंतर तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिने रुग्णालयात प्राण सोडले.

मनिषाच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नाची जोरदार तयारी केली होती. घरासमोर भलामोठा मंडप, लग्नासाठीच्या स्वयंपाकाची तयारी सुरु असल्यामुले सगळीकडे लगीन घाई सुरु होती. पण, या अपघाताने कुंटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या मंडपातून मनिषाला सासरी पाठवायचे होते, त्याच मंडपातून तिची अंत्ययात्रा काढण्याची वेळ संदिपान गावडे यांच्यावर आली.

उस्मानाबाद शहरापासून केवळ २० किमी अंतरावर असणार्‍या बेंबळी गावातील या घटनेमुळे लग्न घरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी मनिषाचा विवाह पार पडणार होता. तिच्या लग्नाची कुटुंबियांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, हळदीच्या दिवशी सायंकाळी घराच्या अंगणात उभारलेल्या मनिषाच्या अंगावर पिलर पडला त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. लग्नाच्या पूर्वसंध्येलाच मुलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़.