पुसदमध्ये गोळीबारात तरूण ठार ; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या वादातून हल्ला

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या, त्यातील दोन इम्तियाजला लागल्या.

हल्लेखोरांनी नागरिकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला व ते घटनास्थळावरून पसार झाले.

यवतमाळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात तरूण ठार झाला. ही घटना पुसद येथे वाशिम रोडवर असलेल्या हॉटेल जम-जम समोर आज रविवारी दुपारी १ वाजेदरम्यान घडली. इम्तियाज खान सरदार खान (३०) (रा. अरुण ले आउट पुसद), असे मृताचे नाव आहे.

इम्तियाज चारचाकी वाहने दुरुस्तीचे काम करायचा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज दुपारी तो दुकानासमोर उभा असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी इम्तियाजवर गोळ्या झाडल्या हल्ल्यापासून बचावासाठी इम्तियाजने पळ काढला होता, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या यातील दोन गोळ्या इम्तियाजच्या मानेत आणि डोक्यात लागल्या. त्यामुळे इम्तियाज रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी नागरिकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला व ते घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पुसद व वसंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी जखमी इम्तियाजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सहाय्यक पोलीस अधीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाकरिता सूचना केल्या. गुन्हेगारांच्या आपसी वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man killed in pusad firing attack from a criminal background dispute msr

ताज्या बातम्या