फेसबुकवर तरुणीची बदनामी; अल्पवयीन मुलाला अटक

तरुणीच्या नावाने फेसबुकवर बोगस अकाऊंट तयार करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला नागोठणे पोलिसांनी जिल्हा सायबर क्राइम सेलच्या मदतीने अटक केली आहे.

तरुणीच्या नावाने फेसबुकवर बोगस अकाऊंट तयार करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला नागोठणे पोलिसांनी जिल्हा सायबर क्राइम सेलच्या मदतीने अटक केली आहे.
नागोठणे येथील  तरुणीच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बोगस अकाऊंट तयार केले होते. तिचे नाव पाहून काहींनी रिक्वेस्ट स्वीकारल्या होत्या, परंतु त्यानंतर त्या व्यक्तीने अश्लील फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी नागोठणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.   फेसबुक कंपनीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या सिमकार्डचा व मोबाइलचा वापर करून हे बोगस अकाऊंट तयार करण्यात आले होते त्यावरून त्यामागे नागोठणे येथील स्वराज संदेश गिजे (वय १७) याचाच हात असल्याचे निष्पन्न झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Youth arrested for defaming girl on facebook

ताज्या बातम्या