सांगली : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली व मिस यू असा संदेश देत वाळव्यात एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. तरुणाचे नाव योगेश सचिन फाळके उर्फ मालेवाडीकर (वय २३) असे आहे. मोबाईलवर रील बनविण्याच्या अतिधाडसातून या तरुणाने मृत्यूला कवटाळले असल्याच्या चर्चेने वाळव्यात खळबळ माजली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे”; राजू शेट्टींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले

हेही वाचा – “आम्ही यासाठी राजकारणात आलोच नाही, काहीतरी…”, दादा भुसेंच्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळेंचं टीकास्र!

वाळव्यातील बाराबिगा परिसरात फाळके याची दोन घरे असून एका घरात त्याचे वडील दोन बहिणीसह वास्तव्यास आहेत, तर एका घरात त्याचे वास्तव्य होते. डाळिंबाचा व्यापार करणारा हा तरुण सोमवारी रात्री एकटाच घरी होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस प्रसिद्ध केले. तसेच एक ध्वनी चित्रफीतही प्रसारित करून मिस यू, असा संदेशही दिला. हा संदेश त्याच्या काही मित्रांना सकाळी दिसला. मित्रांनी तात्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क साधून योगेश कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी तो राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहिले असता त्याने तुळीला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth commits suicide in walwa sangli by keeping his own photo on whatsapp status ssb
First published on: 21-03-2023 at 18:52 IST