सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीवर्धक यंत्रणेच्या आवाजात बेधुंद नृत्य करीत असताना एका तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कवठे एकंद (ता. तासगाव) येथे सोमवारी रात्री घडली.
हेही वाचा – सातारा : महाबळेश्वरमध्ये साडेसहा कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त




हेही वाचा – “निवडणूक आयोगाचा निर्णय…”, अध्यक्षपदाच्या निवडीवरून अजित पवारांचं विधान
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुका सोमवारी होत्या. अनेक मंडळांनी डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईसह ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर यावेळी केला होता. बस स्थानक चौकात मिरवणूक आल्यानंतर नृत्य करीत असताना शेखर पावशे (वय ३२) हा जागीच कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर ॲंजोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.