सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांचा मावा देण्यावरून एका तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, ३० रुपयांचा पानटपरी वरील मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून शहरातील वडर गल्लीमध्ये वास्तव्य असलेल्या नारायण सुरेश पवार या (वय २८) तरुणाला रविवारी चाकूने भोसकले होते. घटनेनंतर त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलीसांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात करुन गर्दी पांगली होती.

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन संशयित तरुणाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितामध्ये त्याचे नातलग असल्याची माहिती मिळाली.