वाडा तालुक्यातील मौजे गो-हे येथील एका घरामध्ये बोगस नोटा छापल्या जात असल्याचा प्रकार वागले इस्टेट ठाणे पोलिसांनी उघडकीस आणला असुन या प्रकरणी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.गोऱ्हे येथील एका घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बोगस नोटा छापल्या जात असल्याची खबर ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक वाडा पोलीसांनी याबाबत कुठलीच माहिती न देता आज बुधवारी दुपारी अचानक बनावट नोटा छापल्या जात असलेल्या घरात धाड टाकली.
या धाडीत नोटा छापण्यात येणारी मशीन दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या तरुणांना ठाणे पोलीस ठाण्यात नेले असुन येथील पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात या परिसरातील तब्बल १०ते १२ तरुणांचा समावेश असुन ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.