प्रेक्षक तरुणामधून चक्क आय लव्ह यू म्हणत एका तरुणांने साद घालताच सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित अचंबित झाली. मुक्त संवादामध्ये महाविद्यालयीन तरुणांकडून आलेल्या या सादाला अभिनय क्षेत्रातील असणाऱ्या आव्हाने आणि संधीची ओळख तरुणाईला करुन दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या एसबीजीआय ग्रुप इन्स्टिट्यूटच्या स्नहसंमेलनानिमित्त अभिनेत्री पंडित यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी पत्रकार संघटनेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. दीपक मुद्गल आणि किरण जोशी यांच्या श्रीमती पंडित यांचा मानपत्र, स्मृती चिन्ह देउन अध्यक्ष हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा >>> Video: गोष्ट असामान्यांची: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या भीमगीतांचं फिरतं डिजिटल ग्रंथालय!

यावेळी बोलताना श्रीमती पंडित म्हणाल्या, सिनेमा क्षेत्र चांगले असून या ठिकाणी कोणत्याही जाती, धर्माला थारा नाही, मात्र, तुमच्यात कलात्मकता आणि सर्जनशीलता असेल तर  निश्‍चित यश मिळते. मात्र, कालचे यश कायम राहिलच असे नाही तर टिकून राहण्यासाठी अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते.

प्रत्येक भूमिका ही वेगळी असते. यामुळे ती व्यक्तीरेखा साकारत असताना एक प्रकारचा परकाया प्रवेशच असतो. यापुढील काळात मला अंध मुलीची भूमिका करायची आहे. कारण शब्दाविना आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे या निमित्ताने कळणार आहे. तसेच नजीकच्या काळात ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिंधूताई सपकाळ यांची भूमिका मला  मिळाली. यातून अभिनयाचे विविध पैलू  प्रेक्षकांसमोर सादर करता आले, मात्र, यापुढे मी व्यक्तीचित्र साकारणार्‍या भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> ‘धावत्या रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, मग मुलीने रेल्वेबाहेर मारली उडी’, थरकाप उडवणारा VIDEO

 मिळालेली भूमिका कथानकाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे व्यक्तीरेखा जर वगळली तर कथानकावर परिणाम होत असेल तर तिचे महत्व   अधोरेखित होते. असल्याने अशाच भूमिका मी स्वीकारल्या असेही श्रीमती पंडित यांनी सांगितले. एखादा चित्रपट चांगले यश मिळवून देतो, मात्र हे  यश कायम राहीलच असे नाही, मात्र, टिकून राहण्यासाठी या क्षेत्रात  रोजचा संघर्ष अटळ असतो असेही  त्या म्हणाल्या. यावेळी एका विद्यार्थ्यांने आज तुम्ही खूप सुंदर दिसता असे म्हटल्यानंतर दुसर्‍या विद्यार्थ्यांने तुम्ही रोजच खूप सुंदर दिसता, मात्र, मला तुमच्या सोबत छायाचित्र  घेण्याची इच्छा व्यक्त केली तर एका तरूणांने चक्क आय लव्ह यू असे सांगत असताना अचंबित झालेल्या श्रीमती पंडितांनी खेळकरपणे या म्हणण्याला दुर्लक्षित करुन बगल दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth say i love you to film actress tejaswini pandit in public event zws
First published on: 30-03-2023 at 17:31 IST