महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावाला केंद्रीय आरोग्य पथकाने आज भेट दिली. यावेळी आरोग्य पथकाने परिसराची पाहणी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. सध्या बेलसर परिसरातील सहा गावांमध्ये १५ टिम कार्यरत असून रॅपिड टेस्ट सुरू आहेत. येथील सर्व माहिती केंद्राच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाला दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य पथकामध्ये डॉ. मंगेश गोखले (एनआयव्ही,पुणे), हिम्मत सिंह पवार (एन.आय.एम.आर,दिल्ली), डॉ.नयन शिल्पी (स्त्रीरोगतज्ज्ञ,लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय,दिल्ली), अजय बेंद्रे (डी.एम.ओ,पुणे),डॉ महेंद्र जगताप (स्टेट ऎंन्टोमॉलॉजिस्ट) आणि डॉ प्रणील कांबळे ( राज्य आरोग्य विभाग ) आदींचा समावेश होता. १६ जुलैपासून या परिसरातील १४२ रुग्णांचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये ५ डेंग्यू, ६३ चिकनगुनिया व एक झिकाचा रुग्ण आढळून आला.

बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आरोग्य पथकाने स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ.भरतकुमार शितोळे,डॉ.सागर डांगे,गटविकास अधिकारी अमर माने, सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच धिरज जगताप यांच्याशी झिका प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात चर्चा केली .सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही बेलसरला भेट देऊन केंद्रीय आरोग्य पथकाशी उपाय योजना बाबत चर्चा केली.

Explosion tire shop near Sangola
सोलापूर : सांगोल्याजवळ टायर दुकानात स्फोट; एकाचा मृत्यू, दुसरा जखमी
In Karveer taluka relatives were shocked to find another dead body in the crematorium instead of the original person
मूळ व्यक्ती ऐवजी दुसराच मृतदेह; स्मशानभूमीत पोहोचलेल्या नातेवाईकांना धक्का
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर
Driver dies along with sibling after hitting tracks on negligently parked trailer solhapur
निष्काळजीपणे थांबलेल्या ट्रेलरवर ट्रॅक्स आदळून भाऊ-बहिणीसह चालकाचा मृत्यू

Corona Update : राज्यात नव्या करोनाबाधितांचा आकडा वाढला, पण मृतांच्या संख्येत घट!

बेलसर,खानवडी,वाळुंज,निळूंज,कोथळे,पारगाव या सहा गावांमध्ये ७९ गर्भवती महिला आहेत.त्यातील बेलसर येथे २४ महिला आहेत. या सर्वांशी संपर्क साधण्यात आला असून त्या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य पथक व संजय जगताप यांनी झिका बाधित महिलेच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली. गावात डास आळीचा प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणत्या उपाययोजना आहेत याची प्रत्यक्ष पाहणी केली. “गर्भवती महिलांमध्ये हा झिकाचा संसर्ग झाल्यास विकसनशील गर्भास हानी पोहचते आणि जन्मजात विसंगती होण्याची शक्यता असते. झिका व्हायरस डासांमुळे होतो त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.”, असं डॉ. नयन शिल्पी यांनी सांगितलं.गर्भवती महिलांना आवश्यक ती काळजी घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. लोकांनी झिका आजाराला घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं.

  • महिलांनी झोपताना मच्छरदाणी वापरावी
  • डास दिवसाही चावतात त्यामुळे पूर्ण कपडे घालावेत
  • दिवसाही अंगाला डास प्रतिबंधक मलम लावावे
  • वेळच्या वेळी तपासण्या करून घ्याव्यात
  • पाणी साठवून ठेवू नये

Container House मध्ये होणार तळीये ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! CSR निधीतून मागवली घरं!

जेजुरीतही चिकनगुनिया आजाराचे सर्वेक्षण होणार

श्रीक्षेत्र जेजुरी येथे चिकनगुनियाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेकडो नागरिक आजारी आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता याची गंभीर दखल घेऊन जेजुरीतही तातडीने शासनातर्फे सर्वेक्षण करुन रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेमध्ये जेजुरीतील आजारी रुग्णांची तपासणी व्हावी अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.