जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हिंदुराव चौगुलेंकडे

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाचा प्रभारी कार्यभार उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले यांना देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत पुढील प्रक्रियेचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी हा आदेश दिला आहे.

काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या प्रा. संजय मंडलिक हे सध्या महायुतीच्यावतीने लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या पार्श्र्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडे दिला होता. मात्र हा राजीनामा योग्य नसल्याने प्रा. मंडलिक यांनी स्वत विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर श्री. देशमुख यांनी नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांना केल्या होत्या. त्यानुसार येत्या आठ दिवसांत कार्यक्रम जाहीर केला जाईल.
आज जिल्हा परिषद अध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आली. तसे आदेश जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया आता सुरू झाल्याने अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zp chairman charge to hindurao chaugule