बरोबर-चूकचं प्रकरण माणसाला कळायला लागल्यापासून त्याच्या मागं लागलेलं असतं आणि खरं सांगायचं झालं तर, ‘त्याला खरं कळायला लागेपर्यंत’ ते त्याचा पिच्छा सोडीत नाही. अनेकदा हे चूक-बरोबर सापेक्ष असतं, तांत्रिक असतं, समजून घेण्याचा विषय असतो. लक्षात घेतलं नाही तर आग्रही मतं, अकारण ठामपणा, संबंधांतले तणाव, समाजातले भेद, भांडणं, युद्ध – इथपर्यंत ते माणसांना घेऊन जातं.

एकदा एक गंमत झाली. एक जण टायिपग करीत होता. दुसरा काही कामात होता. दुसऱ्याचं काम थांबलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, पहिला टायिपग करताना कुठं तरी अडला आहे आणि धडपड करतो आहे. म्हणून त्यानं सहज पहिल्याला विचारलं, ‘‘काही अडलं आहे का?’’ पहिला म्हणाला, ‘‘होय. यात ‘बरोबर’चं चिन्हच येत नाही.’’ दुसरा म्हणाला, ‘‘जरा वर शोध की. त्यात ते  चिन्ह आहे!’’ पहिला म्हणाला, ‘‘ते माझं सगळं शोधून झालं आहे. कुठल्याच ‘की’वर ‘बरोबर’ हे चिन्ह नाही.’’ ते ऐकल्यावर दुसरा

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘आहे!’’ पहिला म्हणाला, ‘‘नाही.’’ हे बराच वेळ आहे-नाही सुरू राहिलं! शेवटी पहिला म्हणाला, ‘‘कुठं आहे, ते दाखव.’’ दुसरा जरा घुश्शातच आला आणि त्यानं वरच्या ओळीमधली ‘बरोबर’ चं चिन्ह असलेली ‘की’ दाबली. लगेच समोर बरोबरचं चिन्ह उमटलं!

त्या दोन रेघा बघून  (=) पहिल्याचा पारा चढला. तो म्हणाला, ‘‘मला  हे ‘बरोबर’ नको आहे. मला दुसरं  ‘बरोबर’चं चिन्ह पाहिजे.’’ दुसरा गोंधळात पडला. तेव्हा पहिल्यानं रागारागानंच हातातलं पेन घेऊन त्याला हवं असलेलं ‘बरोबर’ (✓) चं चिन्ह काढून दाखवलं. दुसऱ्यानं कपाळावर हात मारून घेतला.  पहिला म्हणाला, ‘‘एकंदरीत आपण ‘दोघंही बरोबर’ आहोत आणि ‘चूकही’ आहोत.’’ मित्र असल्यामुळं त्यांनी त्या ‘दोन’ चूक आणि बरोबर असल्या गोष्टींतली निभ्रेळ गंमत समजून घेतली.

आता यात ते दोघे मित्र होते. तसा मुद्दाही छोटासा होता. थोडा त्रागा झाला, तरी समजून घेण्यानं तो विरून जाण्यासारखा होता. पण हेच प्रश्न असे नुसते शाब्दिक पातळीवर चूक किंवा बरोबर क्वचितच असतात. ते तसे तांत्रिक असले तरी, त्यात समजूत असली, तरच तेसुद्धा सुटू शकतात. नाही तर चूक ठरवणारा आणि माझंच बरोबर असं म्हणणारा दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम राहतात. राग डोक्यात घेऊन, यांना समजत नाही असं समजून, आपापल्या घरी निघून जातात.

एखाद्याच्या घराची खूण सांगायची असली, तर एक जण म्हणतो, ते घर पश्चिमेला आहे. त्यातलाच दुसरा म्हणतो, ते पूर्वेला आहे. ज्याला घरच माहीत नाही, तो गोंधळात पडतो आणि यांचं पूर्वपश्चिम काही संपत नाही. उलट मी प्रत्यक्ष पाहिलंय, असं ते म्हणत राहतात. वास्तविक त्या एखाद्याचं घर एका विशिष्ट ठिकाणीच असणार ना? उघड आहे की, पहिल्याचं घर या एखाद्याच्या घराच्या पूर्वेला आहे. म्हणून तो ठामपणानं ते घर पश्चिमेला आहे म्हणतो आहे. तर दुसऱ्याचं घर त्या एखाद्याच्या घराच्या पश्चिमेला आहे. म्हणून तोही ठामपणानं ते घर पूर्वेला आहे म्हणतो आहे. घर तेच. दोघांच्या खुणा या अर्थानं बरोबरच. पण वाटताना उलटसुलट वाटून दोघेही बरोबर आणि चूक ठरतात आणि ते कुणाला न कळलं, तर दोघंही ठाम राहून, दुसऱ्याला काही कळत नाही, असं म्हणू शकतात. मूळ खूण समजून घेणारा गोंधळात पडतो, ते वेगळंच!

असल्या प्रश्नात जो तो मार्ग काढील, पुढं जाईल, त्याचं काम साध्य करून घेईल. पण हेच बरोबर-चूकचं प्रकरण माणसाला कळायला लागल्यापासून त्याच्या मागं लागलेलं असतं आणि खरं सांगायचं झालं तर, ‘त्याला खरं कळायला लागेपर्यंत’ ते त्याचा पिच्छा सोडीत नाही. अनेकदा हे चूक-बरोबर सापेक्ष असतं, तांत्रिक असतं, समजून घेण्याचा विषय असतो. लक्षात घेतलं नाही तर आग्रही मतं, अकारण ठामपणा, संबंधांतले तणाव, समाजातले भेद, भांडणं, युद्ध – इथपर्यंत ते माणसांना घेऊन जातं. हे कळलं तर सखेद आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे.

साधी वेशभूषा घ्या. पूर्वीच्या शतकातली वेशभूषा त्या काळात प्रचलित, उपलब्ध आणि कामकाजांना अनुकूल असलेली – म्हणजे त्या अर्थानं बरोबरच होती. मधल्या अगदी या शतकापर्यंतच्या काळातली वेशभूषा या काळातल्या कामं, गरजा यांना अनुकूल, म्हणून बरोबरच होती. इथून पुढं हे असंच होत राहील. त्या-त्या पिढीची माणसं एकत्र आली की, ती पुढच्या पिढीला चूक, उथळ ठरवतात. दुपारचा मोकळा वेळ त्यावर िनदा करण्यात जातो. असा तासन्तास विनाकारण, निंदेत, नावं ठेवण्यात, नकारात्मक जगण्यात जाणारा वेळ वाचवणं शक्य आहे ना? ते गरजेचं आहे ना? त्या वाचलेल्या वेळात अशा असंख्य व्यक्तींकडून रोज त्यापेक्षा नक्की, किती तरी विधायक कामं होऊ शकतील. पाठ, पारायण, वाचन, ज्ञान-कौशल्य संपादन, समाजसेवा, ईशसेवा – अशा असंख्य गोष्टी या वाया जाणाऱ्या वेळात घडू शकतील. तशा घडवणारे लोक आजही अशी विधायक कामं करीत आहेत.

मत, आग्रह, अनुभव हा जरूर ‘बरोबर’ असू शकतो. तो जेव्हा समग्र, व्यापक, सार्वत्रिक हिताचा असतो, त्या वेळी तो नुसता व्यक्तिगतदृष्टय़ा बरोबर राहत नाही, तर तो कौटुंबिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा बरोबर ठरतो. मग त्या अर्थानं त्यात ‘चूक’ नसल्यामुळं त्याचा स्वीकारही होतो. अर्थात या बरोबर असण्याला त्या-त्या काळाची, गरजांची, प्राथमिकतांची मर्यादा असणार म्हणून ‘आपलं ते बरोबर’ असा आग्रह धरण्यानं या बाबतीत नुकसान होतं. म्हणून तर, व्यवस्थापनशास्त्रातही नियोजन करताना, विचार करून काही ‘बरोबर’ ठरवावं लागतं, त्यानुसार कामं, वेळा, माणसं, लक्ष्य यांचं नियोजन करावं लागतं. यातले घटक बदलत नाहीत, तोपर्यंतच ‘हे नियोजन बरोबर असतं.’ या बाबी बदलल्या तर मात्र, ते हळूहळू चुकीचं ठरून नुकसानकारक होतं. म्हणून अनेकदा कंपनीला ते बदलावं लागतं. औद्योगिक क्षेत्रांतसुद्धा पहिलं ‘बरोबर’ असलं तरी  काळ, तंत्रज्ञान, ग्राहक यांच्यातले बदल घडले की, ‘हे बरोबर’ हे हळूहळू ‘चूक’ ठरायला लागतं. उत्पादनावरचे भर, उत्पादनसंख्या, मार्केटिंग पॉलिसीज् – बदलत जावं लागतं. तरच त्यावेळी ते ‘बरोबर’ ठरतं.

कौटुंबिक आयुष्यातसुद्धा शिक्षणं, निवासस्थानं, गावं – यांच्या बाबतीतले निर्णय, या ‘बरोबर-चूक’च्या मर्यादा लक्षात घेऊन, ठरवणं हिताचं होतं. आमच्या काळी शाळा दोन-दोन, पाच-पाच मलांवर होत्या. त्यामुळं सक्तीनं चालणं होत होतं. निसर्गाचं सान्निध्य मिळत होतं-त्याला काळाचा संदर्भ असतो. त्या बाबतीत, त्या वेळी ते ‘बरोबर असतं’, नव्हे ‘होतं’, हे लक्षात घेणारे खरे मोठे. कारण ते आजच्या काळावर ‘असलं बरोबर’ लादण्याचा आग्रह धरीत नाहीत. त्याचा आग्रह आता धरला, तर ‘तेच बरोबर’ असलेलं मुला-नातवंडाच्या बाबतीत ‘आज चूक’ ठरेल!

हेच इतर असंख्य प्रश्नांच्या बाबतीत खरं असतं, हे आपल्या लक्षात येईल. कुटुंबा-कुटुंबातले मतभेद, जातीपातीतले दुराग्रह, संस्कारातली कट्टरता, धर्माधर्मातले भेद – अशा असंख्य पातळ्यांवर अशा ‘आपलं बरोबर’ आणि ‘दुसऱ्याचं चूक’ या ठेक्यावर चालण्यात अनेक दुखं निर्माण होत असतात. सुरुवातीला पाहिलं तसं, साध्या बरोबर चिन्हाला बोलीभाषेत दोन अर्थ असतात, ते समजून घेतले नाहीत, तर अकारण बोलाचाली होते. अशा साध्या बाबतीतसुद्धा साध्या अर्थाचा अज्ञानानं, बिनसबुरीनं, असमंजसपणानं अनर्थ होतो. मग दोन कुटुंबातले काय म्हणतात, यापेक्षा त्यांना काय म्हणायचं आहे, दोन धर्मात शब्दश: काय म्हटलं आहे, त्यापेक्षा त्यांना काय म्हणायचं आहे – हे लक्षात न घेता आपल्या नादात अर्थ लावत गेलो, तर केवढा अनर्थ साऱ्या जगात निर्माण होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी! तिचा अनुभव येतच आहे.

यासाठी मला रोज काय करता येईल, हा खरा प्रश्न आहे. उत्तर तसं सोपं आहे. ‘माझ्या बरोबर’मध्ये माझ्या मर्यादा आहेत. जग अमर्याद आहे. त्यामुळं ‘माझं थोडं चूक’ गृहीत धरावं आणि ‘दुसऱ्याच्या चूक’मध्ये ‘त्याचं थोडं बरोबर’ गृहीत धरावं. तर रोज आपल्या शांतीत आणि आनंदात वाढ होते. मग आपल्या जगण्याच्या डहाळीवर छोटंसं का होईना, प्रसन्न फूल उमलेल. ते आपल्याला, इतरांना नकळत आनंद देऊन जाईल!

सुहास पेठे drsspethe@gmail.com