खरं तर हे साठ सेकंदांचं मिनिट, हे मिनिट फारच किरकोळ वाटतं. पण हे एवढंसं मिनिट साऱ्या महिन्याच्या आखलेल्या कामांचा गोंधळ उडवू शकतं आणि त्याच बरोबर आपल्या साऱ्या उत्साहावर पाणीही पाडू शकतं. हा तर केवळ एका मिनिटाचा एका विषयातला प्रताप, अशी अनेक ‘एक मिनिटं’ किती तरी गोष्टी घडवायला, बिघडवायला, चांगल्या-वाईट करायला कारणीभूत ठरू शकतात.

मनुष्य विचारशील प्राणी आहे. प्रत्येकाच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात, हा अनुभव आपल्याला असेलच. झालेल्या गोष्टी, करायची कामं, कुठल्या घटना, आलेले प्रसंग, भविष्यातल्या गोष्टी, समोरचा अभ्यास, पडलेली कामं – इथपासून ते जगातल्या घडामोडींपर्यंत, त्या क्षणी विचाराला काय विषय असेल, हे सांगता येत नाही. निश्चित दिशेनं, जरूर असलेले, व्यवस्थितपणे केलेले विचार- माणसाचं काम सोपं करतात, यशस्वी करतात, यात शंका नाही.

mumbai records hottest temprature in 10 years
मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ
More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
uran city residents facing water shortage
उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट; दोन्ही धरणांनी तळ गाठला
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

कमी गरजेच्या गोष्टींवर मनुष्य निवांतपणे आणि कमी विचार करतो, तर जास्त निकडीच्या, तातडीच्या मोठय़ा प्रश्नांवर खूप आणि लगेच विचार करतो. पण आपण हाही विचार करावा की, गोष्ट कमी वेळात घडणारी असेल, लहान वाटत असेल, गरजेची, तातडीची वाटत नसेल, तरी ती विचार करण्यासारखी नसते, काही कमी महत्त्वाची असते असं नाही. अशी एक दुर्लक्षित गोष्ट म्हणजे – ‘एक मिनिट’!

असं म्हणण्याला कितपत अर्थ आहे, ते पाहू. एखाद्या खूप लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी हजारो रुपये भरून कुटुंबातल्या सगळ्यांचं रेल्वे प्रवासाचं आरक्षण केलेलं असतं. त्या दृष्टीनं लागणाऱ्या सर्व व्यवस्था, तयारी चालू असते. ज्या दिवशी जायचं, त्या दिवशी सकाळपासून सारी आवराआवर करून, सामान, बॅगा सगळं भरून आपल्या कुटुंबीयांना घेऊन, मनुष्य टॅक्सी करून, स्टेशनवर पोहोचतो. वाटेत कुठं तरी रहदारीत अडकायला होतं. काही वेळा टॅक्सीवाल्याचा चालवण्याचा वेग कमी असतो – असं काहीही असू शकतं. रेल्वेस्थानकाच्या आवारातल्या रांगेतून टॅक्सी क्रमानं पुढं येते, सामानासह रिकामी होते. सामानासह पायऱ्या चढून रेल्वेच्या फलाटावर मनुष्य पाऊल टाकतो. तोपर्यंत त्याच्या डोळ्यांसमोर रेल्वेची शिट्टी होऊन, ती सुरू झालेली असते. फलाटावर पोहोचेपर्यंत शेवटच्या डब्यातल्या गार्डच्या हातातला फक्त हिरवा झेंडा लांबवर फडकताना दिसतो. गाडीनं वेग घेतलेला असतो. सबंध महिन्याभराच्या प्रवासाची सुरुवातच चुकते. तीही फक्त एक मिनिटानं!

कदाचित हेच एक मिनिट आधी आलो असतो, तरी स्टेशनमास्तर, गार्ड, प्रवासी कुणालाही सांगून, आधीपासून ठरवलेल्या त्या रेल्वेत प्रवेश मिळणं शक्य असतं आणि त्यामुळं पुढचा आखलेला सर्व दौराही आपल्या सोयीच्या वेळापत्रकाप्रमाणं पार पाडणं शक्य असतं. नुकसान पत्करता येतं. वेगवान गाडी चुकली तरी दुसऱ्या कुठल्या गाडीनं, काही तासांनंतर तोच प्रवास करताही येतो. पण जे एका मिनिटानं चुकलं, ते तसंच्या तसं दुरुस्त करता येत नाही. असं हे मोलाचं ‘एक मिनिट’!

खरं तर तसे हे फक्त काही सेकंद! त्या साठ सेकंदांचं मिनिट, त्या साठ मिनिटांचा तास, अशा चोवीस तासांचा दिवस, अशा तीस दिवसांचा महिना.. असा विचार केला, तर हे मिनिट फारच किरकोळ वाटतं. पण हे एवढंसं मिनिट साऱ्या महिन्याच्या आखलेल्या कामांचा गोंधळ उडवू शकतं आणि त्याच बरोबर आपल्या साऱ्या उत्साहावर पाणीही पाडू शकतं. हा तर केवळ एका मिनिटाचा एका विषयातला प्रताप. अशी असंख्य एक एक मिनिटं आपल्या आयुष्यात अनेकदा किती तरी गोष्टी घडवायला, बिघडवायला, चांगल्या-वाईट करायला कारणीभूत ठरू शकतात. हे ज्यांनी विचार केला असेल त्यांच्या लक्षात येईल. आधी म्हटलं तसं अनेकांच्या दृष्टीनं एक मिनिट व्यवहारानं छोटं, किरकोळ, वेळी नगण्य, कमी महत्त्वाचं – असं कळत-नकळत वाटल्यामुळं, त्यावर अनेक जण विशेष विचारही करीत नाहीत.

पण वस्तुस्थिती पाहिली, तर ती या एका मिनिटाचं महत्त्व केवढं आहे याची जाणीव करून देणारी आहे. आपण आत्ताच उदाहरण पाहिलं. तसंच आपण असाही प्रसंग अनुभवला असेल. एस्.टी.त प्रवासी बसलेले आहेत, ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आहे, कंडक्टर एका हातानं दरवाजा बंद करताहेत आणि दुसऱ्या हातात बेल आहे. अशा परिस्थितीत, मनुष्य हात करीत दरवाजाजवळ पोचतो, तो कंडक्टरना दिसतो. बेलचा हात थांबवून, दरवाजा उघडून प्रवाशाला ते आत घेतात, दोन बेल होतात आणि गाडी सुटते. खूप मोठय़ा लांबच्या प्रवासाच्या गाडीत त्याला प्रवेश मिळतो. प्रवास ठरल्याप्रमाणं सुखकर होतो, तोही फक्त या एक मिनिटात!

आयुष्यातले शिक्षण क्षेत्रातले प्रवेश असोत, नोकरीची संधी स्वीकारण्याचे निर्णय असोत, आयुष्यातल्या जोडीदाराला हो किंवा नाही म्हणणं असो, घर हे घ्यावं की ते असा मोठा प्रश्न असो – आधी खूप विचार झालेला असतो. शेवटी निर्णय घेण्याचा एक दिवस येतो. त्या दिवशी सकाळी दहा, संध्याकाळी पाच, रात्री नऊ – अशा कुठल्या तरी वेळेला निर्णय देण्याचा अंतिम टप्पा येतो. शेवटच्या मिनिटात, ज्याच्यावर निर्णय अवलंबून आहे, अशा व्यक्तीचा दोन्ही बाजूंचा साधकबाधक विचार एका अंतिम टप्प्याला येतो आणि त्या मिनिटात ठरतं की, होय किंवा नाही. त्या वेळी घेतलेल्या त्या निर्णयाचा परिणाम असा कुठं एक-दोन महिन्यांवरच नव्हे, तर वर्षांनुवर्षांवरसुद्धा होतो. तो नुसता निर्णयच उरत नाही तर, अनेकांचा अनुभव असेल, की त्यांच्या आयुष्याची दिशा आणि प्रवास त्या निर्णयानं बदलून जातो. असं हे मोलाचं ‘एक मिनिट’!

या एक मिनिटाचं आणखीही खूप महत्त्व आहे. लाखो रुपयांच्या देवघेवीच्या व्यवहारावर मनुष्य सही करतो ती फक्त एक मिनिटात. आधी कितीही कागदपत्रं, बठका, भेदमतभेद, फिरवाफिरव, गोंधळ – असं त्या त्या विषयाबद्दल काहीही झालं असलं, तरी त्याचा अंतिम निकाल होतो, त्या साऱ्याला निर्णायक पूर्णविराम मिळतो, तो या सहीनं, जी होते केवळ एक मिनिटात! तसंही इतर किती तरी व्यवहारात, हे घडताना आपल्याला आढळेल. मनुष्य या अवाढव्य जगात येतो, तोही एका मिनिटात. तसाच या जगात तो शंभर र्वष जरी वावरला, तरी जातो तो एका मिनिटात.

इतकंच नव्हे, एखाद्या माणसाला काही जिवावरचा आजार होतो. एका मिनिटात तो कोसळतो. तातडीनं हालचाल होते किंवा कुणी अगदी योग्य माणूस शेजारी असतो. तो पुढच्या एका मिनिटात हालचाली करतो, एका मिनिटात गेलेला जीव दुसऱ्या मिनिटाला पुन्हा जगात परततो. अनेकदा हे उद्गार आपण डॉक्टरांकडून ऐकले असतील की, ‘एक मिनिट जरी आधी आला असता, तरी आपण काही प्रयत्न करू शकलो असतो, जीव वाचला असता.’ फक्त एखाद्या मिनिटात बोललेले आपुलकीचे, जिव्हाळ्याचे शब्द माणसाला सावरतात, त्याच्या मनाला उभारी देतात. तशाच एका मिनिटात बोलल्या गेलेल्या चार शब्दांतला अपमान माणसाच्या जिव्हारी लागतो. पहिला एका मिनिटानं जोडला जातो, जवळ येतो, तर दुसरा अशाच एका मिनिटानं तुटतो, दूर जातो. आपण इतका विचार करतो आहोत, तर मग या एका मिनिटावर काही विचार करणं आवश्यक आहे, हे नक्की ना?

अनेकांना हेही वाटलं असेल की, हे ‘एक मिनिट’ किती महत्त्वाचं आहे, हे आता लक्षात आलं आहे. पण त्याचा विचार आपण कसा आणि काय करू शकतो? इथल्या लेखाच्या मर्यादेत आपण एवढं लक्षात घेऊ शकतो, की अशा एका मिनिटाला निर्णायक महत्त्व असतं. प्रश्न निर्णयाचा असेल, तर निर्णयाच्या क्षणी विधायक विचार करायला लागणारी सावधानता आपल्याकडं असावी. त्या क्षणी त्या मिनिटात आपण होकार देणार असू अथवा नकार, तो एकदा दिल्यानंतर त्यावर स्थिर राहण्याची गरज असते. ती आपल्याकडं आहे ना? शेवटच्या या एक मिनिटात घोटाळा घडवणारं – असं प्रवासाची गाडी गाठण्यासारखं महत्त्वाचं मिनिट असेल, तर खाण्यापिण्याच्या वस्तू, सामान, मतं – असल्या गोष्टींवर तासन्तास देण्यापेक्षा ते महत्त्वाचं मिनिट चुकू नये, यासाठी आपण आवश्यक ती दक्षता घेऊ शकतो, नुकसान टाळू शकतो. जिथं जन्म-मृत्यूसारख्या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी असतील, तिथं हे शेवटचं मिनिट शांत, निर्विचार, मनोमुक्त राहण्यासाठी आपल्याला आधीपासून काही तयारी करावी लागते, ती जरूर करू शकू.

एक मिनिट म्हणून त्याचा कालावधी कमी असेल, पण शांत, सुयोग्य जीवन आणि आनंदाची अखेर साधून देणारं हे ‘एक मिनिट’ सावध राहण्याचा, विचार करण्याचा विषय आहे, हे नक्की!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com