अमेरिकेच्या ‘पहिल्या महिला’ हे पद सर्वात जास्त काळ भूषविणाऱ्या अ‍ॅना एलियानॉर रूझवेल्ट या मुत्सद्दी राजकारणी आणि कार्यकर्त्यां होत्या. त्यांनी म्हटलंय, ‘नो वन कॅन मेक यू फील इनफिरियर विदाउट युवर कन्सेंट’.
तुम्ही कमी दर्जाचे आहात, ही भावना तुमच्या मनात तुमच्या मर्जीशिवाय कोणीही वाढवू शकत नाही. आपण आत्मपरीक्षण, स्वमूल्यांकन केलंच पाहिजे. आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे. लहानपणापासून नातेवाईक, आई-वडील, भाऊ, बहिणी आपल्यात काय आहे आणि काय नाही किंवा कमी आहे हे ठरवत असतात, सांगत असतात. परीक्षेत मिळालेल्या मार्कावरून कोणता कोर्स घेण्याची पात्रता आहे हे ठरवलं जातं. आपली शिक्षणपद्धती अचूक आहे का, हा वेगळा प्रश्न आहे. तुझं गणित चांगलं नाही किंवा तू फार उंच आहेस अशा अनेक गोष्टी मनावर नकळत बिंबवल्या जातात, पण मोठं झाल्यावर स्वत:चं परीक्षण करताना मागील गोष्टींचा विचार करू नये. दुसऱ्यांनी दिलेली ओळख खरी नसते. तर तुम्ही स्वत: शोधलेली ओळख हीच खरी असते. हे करताना पराभवाला सामोरं जावं लागलं तर तो सकारात्मक रीतीने स्वीकारा. पराभव म्हणजे आपल्या मर्यादा नसतात. त्यातून मिळालेल्या धडय़ाचा पुढे उपयोग करून घ्या. पडल्यानंतर उभे राहणे हा खरा आत्मविश्वास!
सोनाली चाळिशीच्या आतली. संगणकशास्त्रामध्ये मास्टर्स पदवी घेतल्यानंतर नोकरीला लागली. आपण काय करू शकतो हे तिला चांगलं माहीत होतं. मूल लहान होतं म्हणून तिने सुरुवातीला कस्टमर्स सव्‍‌र्हिसचं काम स्वीकारलं. पुरुष कर्मचारीवर्गाचा काही वेगळाच ग्रह झाला. काम करताना आपल्या अ‍ॅपविषयी माहिती देताना, ते कसं वापरायचं हे सांगताना ग्राहकाचे समाधान होईपर्यंत त्याच्या प्रश्नांना ती शांतपणे, आत्मविश्वासाने उत्तरे देई. काही सहकाऱ्यांना राग येई, काहींना त्याचं महत्त्व वाटत नसे. त्यामुळे ती विचलित होत नसे. मूल मोठे झाल्यावर वेळ मिळू लागला. ती आर्थिक व्यवहारांविषयी बँकांशी बोलणी करणे, नवीन भरतीसाठी येणाऱ्यांच्या मुलाखतींची तयारी करणे, अ‍ॅपच्या विक्रीकरिता जाहिराती बनविणे अशा वेगवेगळ्या कामांकरिता पुढे येऊ लागली. ही एक स्टार्टअप कंपनी असल्यामुळे बऱ्याच कामांमध्ये स्वत:ला सिद्ध करायला तिला वाव होता, पण याचा फायदा इतर घेऊ देईनात. ‘तुझं क्षेत्र कस्टमर सव्‍‌र्हिसपुरतंच मर्यादित ठेव, जे झेपतंय तेच कर, मोठय़ा उडय़ा मारू नको’ हे आणि असं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सांगितलं गेलं. एकदा तर तिला वेळखाऊ मेहनतीचं काही काम दिलं गेलं. तिने ते पूर्ण केल्यावर सांगितलं गेलं की, ते काम दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठांनी ज्यांना सांगितलं होतं त्यांनी पूर्ण केलंय, असे तिचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा, तू कमी दर्जाची आहेस हे दाखविण्याचे प्रयत्न तिने हाणून पाडले. महत्त्वाची, जबाबदारीची कामं करून दाखवली. माझा दर्जा काय आहे हे मला ठाऊकआहे, इतरांनी तो ठरवू नये, हे ती ठामपणे, अभिमानाने सांगते. म्हणूनच ती आज
यशस्वी आहे.

– गीता ग्रामोपाध्ये

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा