मालाकी तारीफ तो करते हैं सब, क्योंकी मोती सबको दिखाई देते हें. तारीफ उस धागेकी है, जिसने सबको जोड रखा है!

सुंदर टपोऱ्या मोत्यांची माळ दिसली की, ‘वा, किती छान, सुंदर’ वगैरे शब्दांनी तिचे कौतुक होते. हे मोती ज्या दोऱ्यात ओवलेले, गुंफलेले असतात तो दोरा दिसत नाही. पण त्याने ते मोती एकत्र ओवलेत म्हणून ही सुंदर माळ तयार झाली, मोत्यांचे सौंदर्य सर्वाना दिसते त्याची स्तुती होणारच, पण त्या दोऱ्याचे कौतुक जास्त आहे ज्याने मोत्यांना एकत्र आणून त्यांचे सौंदर्य वाढविले.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

इकेबाना ही पुष्परचनेची जापनीज पद्धत पाहायला गेलो होतो. रंगीबेरंगी फुलं, पानं, गवताच्या, लाकडाच्या काडय़ा, शोभेची पानं, तुरे, टाचण्या वेगवेगळ्या आकाराची- रंगांची मातीची- काचेची भांडी असे सगळे सामान टेबलवर पडले होते. प्रात्यक्षिक दाखविणारी मुलगी आली. तिने पाचसहा भांडय़ात पाणी घालून त्यात एक किंवा दोन होल्डर ठेवले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या देखण्या पुष्परचना तयार केल्या. आतापर्यंत इतस्तत: पसरलेले ते सामान पिन होल्डर्सने एकत्र केले. सुंदर कलाकृती तयार केली. सुटय़ा मोत्यांची देखणी माळ ओवणारा दोराच ना हा?

आपण सगळ्या गृहिणी म्हणजेसुद्धा एकेक धागाच आहोत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने एकत्र ठेवण्याचे काम करतो. मोठय़ांचा आदर, त्यांची सेवा करून त्यांना कुटुंबरूपी माळेत सजवतो. प्रत्येक सदस्याची आवडनिवड मग ती कोणतीही असो, खाणे-पिणे, शिक्षण, कपडे, कला, व्यवसाय असे बरेच काही गृहिणीच जपते. सगळ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा सांभाळून त्यांना लागणाऱ्या वस्तूंची सोय, मुलांचा अभ्यास अशा अनेकविध कामातून ती प्रत्येक सदस्याची न केलेली मागणी पूर्ण करते. हे सगळे कशासाठी? तर कुटुंबातील सर्वजण कुटुंबातच एकत्र, आनंदाने राहिले पाहिजेत म्हणून! यातून घरातील मुले हे शिकतात आणि पुढील पिढीतसुद्धा असेच धागे आपोआप तयार होतात.

पाश्चात्त्य देशांत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, आपल्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीमुळे मुले सज्ञान, कमावती झाली की आईवडिलांपासून वेगळी राहतात. तरी मुलगी आणि आई हे नातं इतर नात्यांपेक्षा वेगळंच असतं. तिथे आई

मुलीला भेटायचे असेल तर कुठे भेटावे हा प्रश्न पडतो हे साराच्या लक्षात आले, तिने आपल्याच कम्युनिटी सेंटरमध्ये आईमुलींचा क्लब सुरू केला. इंटरनेटच्या माध्यमातून ही गोष्ट सर्वाना लवकर कळली. खूप मुली आपापल्या मातांना भेटायला वारंवार येऊ लागल्या आणि भेटणाऱ्यांची एक साखळीच तयार झाली. या साखळीतून मुली आणि माता यांच्या दोन वेगळ्या साखळ्या तयार

झाल्या. सारा या ‘धाग्याचे’ खूप अप्रूप, कौतुक वाटते सर्वाना.

नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना प्रत्यक्ष भेटणे हल्ली कठीण झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप, ईमेल अशा आधुनिक तंत्रज्ञानाने ते सहज सुलभ केले आहे. याने, न भेटता खूप जणांना एकमेकांच्या जवळ ठेवण्याची किमया केलीय. नात्यामध्ये ओवणारा हा खरोखरीच हा हीअदृश्य धागाच.

गीता ग्रामोपाध्ये

Greetagramopadhye”yahoo.com