निसर्गानं, सृष्टीनं ल्यायलेलं नवं रूप. चवरीसारखी डोलणारी मोहरी शिरे, त्यावर बसलेले पोपटांचे थवे, कोवळी पालवी नुकतेच नेत्र उघडून आनंदाने थरथरतेय आणि ही उमललेली फुले सुवासित गंध पसरवीत आहेत. किशोरवयातलं अनुभवलेलं वसंत वैभव हृदयात कायम साठून राहिलं. आता कुठून कुठे आलोय आपण! आपलं वैभव आपणच ओरबाडून नष्ट केल्यासारखं वाटतं. हल्ली कुणाला वसंत पंचमी माहीत तरी असते का?

निसर्गाने, सृष्टीने ल्यायलेलं नवं रूप. ही हवा, हा वासंती सुगंध वर्षभर कुठे दडून असतो कोणास ठाऊक! आणि आता बघा, अत्तराची कुपी जमिनीवर पडून फुटलीय् जणू आणि सुगंध हवेत पसरलाय. झाडात, पानात, श्वासात भरून राहिलाय. मामाने म्हटलेली कविता आठवतेय, ‘बघा बघा, महंत वसंत आलेत’; चवरीसारखी डोलणारी मोहरी शिरे, त्यावर बसलेले पोपटांचे थवे, जणू ‘बांध पाग पीला’. पिवळी पगडी बांधून आहेत. तेरा-चौदा वर्षांच्या आम्ही.. तेव्हाच्या. रामकुंडातल्या पहिल्या पायरीवर उभं राहून हळूच पाय बुडवला. थंड थंड पाणी. आसपास किती तरी लोक, स्नानाकरिता कुठून कुठून आलेले. आईनं सांगितलं, ‘‘आज कुंडात आंघोळी करा; वसंत पंचमी आहे ना.’’ आज्ञा पालन करीत पटापट डुबक्या मारल्या. इतक्या गर्दीमध्ये मजा येत नाही. उगाचच ‘अपवित्र पवित्रो वा.’ केल्यासारखं.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

घरात शिरल्याबरोबर भद्रकालीच्या छोलेवाल्याकडून आणलेला पत्रावळीचा पुडा दिसला. वा, वा, घीवर! घीवर आणलेसुद्धा! सगळ्यांचे चेहरे उजळले. गरमागरम पाकातून काढलेले पिवळे केशरी घीवर! बारीक, जाळीदार मोठी जिलेबीच; अन् तो वेलदोडय़ाचा सुवास! अहाऽऽ! आज देवघरातही रोजच्या फुलांमध्ये आणलेली ताजी पिवळी केशरी फुले. आसमंतात जणू कोणी लख्ख प्रकाशाचा दिवा लावलाय. समोरच्या वाडय़ातल्या मारवाडी बायका पिवळ्या लेहंगा चुनरीमध्ये सजलेल्या, घुंघट असला तरी, खुशीने गाणी म्हणताहेत, ‘‘लया मने सारी जी लया मने चुंदडी.’’ प्रवेशद्वाराजवळ लावलेलं संगीत

झुंबर, किणकिण किणकिणत मधुर आवाज करतंय, येता-जाता त्याला जागं करणारी खोडकर हवा; समोरचा कडुनिंबाचा विशाल वृक्षही हळुवारपणे डोलतोय. त्यातून डोकावणारं निळंशार, निरभ्र आकाश. इतकं स्वच्छ अन् प्रसन्न! परसातल्या, अंगणातल्या कुंडीतली झाडे, वेली जणू संजीवनी प्यायल्यासारखी झालीत. सारीच जादू झाल्यासारखी वाटते. पंचमीला ताटात घीवर, पिवळाधमक लाडू, वरणभात, बुंदी टोमॅटोची कोशिंबीर न् काय काय! मन, पोट रसना तृप्त!

आता जेवल्यावर बसायचं नव्हतं. दादांनी आम्हा सगळ्या मुलांना सुलीच्या मळ्याकडे हाकललं. ‘‘चला रे, मुलांनो, वीरांचा नाच बघायला.’’ आम्हीही रमतगमत निघतो. मुख्य रस्ता संपून आता दोन्ही बाजूनं शेतं लागली; हिरवीगार, प्रसन्नपणे डोलणारी, वरती निळा डोलारा, तजेलदार पानं, फुलं, मस्तानी, वासंती, चंचल हवा! तेरा-चौदा वर्षांच्या आम्ही, आनंदाने बागडत होतो. ती फुलं तोडून केसात माळली, कानामागे लावली; हातातही फुलांचे गुच्छ घेतले. जणू वनकन्याच! एका झाडावर तर अनारकलीसारखी मोठी फुलं लागलेली; ती पाण्यात भिजवली की पाणी लालपिवळं होणार. रंगपंचमीत हेच पाणी उडणार सगळीकडे. शब्दात सांगता येत नाही पण अनुभवत होते. निसर्गाने, सृष्टीने ल्यायलेलं नवं रूप. चवरीसारखी डोलणारी मोहरी शिरे, त्यावर बसलेले पोपटांचे थवे, जणू ‘बांध पाग पीला’. पिवळी पगडी बांधून आहेत. श्रद्धानत झालेल्या झाडांच्या ओंजळीतून पिवळी गलितगात्र पाने झरझरून खाली पडताहेत, ‘कोंपल के मूंदे नयन’. कोवळी पालवी नुकतेच नेत्र उघडून आनंदाने थरथरतेय आणि ही उमललेली फुले सुवासित गंध पसरवीत आहेत. सरसर, खडखड ताल देणारी हवा व पानाआड लपलेल्या कोकिळेचं मधुर गायन वातावरण भारून टाकीत आहेत. किती सार्थ वर्णन केलंय! मी अनुभवतेय. अनुभवत राहिले, वर्षांनुवर्षे! मध्ये किती तरी काळ गेला.

..आज स्टोअररूममध्ये असलेली जुनी काळी ट्रंक उघडली. जुने ‘अंक’ होते. एक उचलून सहज चाळण्याचा मोह झाला. पानं उलटली. व्ही. शांताराम यांच्या‘स्त्री’ची जाहिरात होती. त्यातलं राजश्रीचं ‘वसंत है आया’ नृत्य आठवलं. इतकं सुंदर गाणं व सुंदर नृत्य! आशा पारेखचं ‘छम छम नाचत आयी बहार’ तरळून गेलं. किशोर वयातलं अनुभवलेलं वसंत वैभव हृदयात कायम साठून राहिलं. आता कुठून कुठे आलोय् आपण! ते सगळं अनुभवणारी मीच का ती? कुठे गेलं सगळं ते? आता त्याचं काय? सगळंच बदललं. आपलं वैभव आपणच ओरबाडून नष्ट केल्यासारखं वाटतं. हल्ली कुणाला वसंत पंचमी माहीत तरी असते का? सगळे विसरलेत जणू!

..हो! माहीत असते ना! रेल्वेच्या लोकल डब्यांमध्ये डोकावून बघावं; पंचमीचा ड्रेसकोड लक्षात ठेवून कुणी पिवळ्या साडय़ा, सूट, टॉप, कुरतीमध्ये दिसतात. या धकाधकीतही कुठे तरी निसर्गाशी नाळ जोडून ठेवायचा प्रयत्न! आज वसंत ऋतू ‘बघायला’, अनुभवायला मिळेना का, पण प्रत्येकाच्या मनात तरी फुलत राहावा इतकंच!

प्रिया श्रीकांत priyaaskul@gmail.com