News Flash

No Time To Die Trailer : बॉण्ड… जेम्स बॉण्ड… हो तो पुन्हा आलाय

'जेम्स बॉण्ड: नो टाईम टु डाय'चा नवा ट्रेलर घालतोय धुमाकूळ

‘जेम्स बॉण्ड’ हा सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. जबरदस्त अॅक्शन आणि अनोख्या स्टाईलमुळे लोकप्रिय झालेल्या ‘जेम्स बॉण्ड’चा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टु डाय’ असं आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

अवश्य पाहा – नरेंद्र मोदींचं अकाउंट हॅक करणारा ‘जॉन विक’ कोण आहे?

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात क्राईम ब्रँचने अभिनेत्रीला बजावलं समन्स

जेम्स बॉण्डच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स आणि चकित करणारे स्टंट पाहायला मिळतात. या चित्रपटात बॉण्डच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले जातील अशी हिंट ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला मिळते. खरं तर हा दुसरा ट्रेलर आहे. ‘नो टाइम टू डाय’चा पहिला ट्रेलर मराठी भाषेसह १० इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला होता. परंतु दुसरा ट्रेलर मात्र केवळ इंग्रजीमध्येच प्रदर्शित झाला आहे. ‘नो टाईम टु डाय’मध्ये अभिनेता डॅनियल क्रेग बॉण्डची भूमिका साकारणार आहे. बॉण्ड सीरिजमधील हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. जेम्स बॉण्डच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट असेल असं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 12:11 pm

Web Title: 007 james bond no time to die new trailer mppg 94
Next Stories
1 “मुंबईने लाखो लोकांना नाव, प्रसिद्धी दिली पण…”, उर्मिलाची कंगनावर टीका
2 “युपीला ग्वांतानामो बे म्हणायचं का?”; संतापलेल्या दिग्दर्शकाचा कंगनाला सवाल
3 ‘द बॅटमॅन’मधील स्टारला करोनाची लागण
Just Now!
X