01 March 2021

News Flash

सलमान ठरला कॅमिओचा बादशहा; पाहुणा कलाकार असून गाजवले ‘हे’ १० चित्रपट

'बिवी हो तो एैसी' या चित्रपटातून सलमानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं

सलमान खान

सलमान खान बॉलिवूडमधलं एक नावाजलेलं आणि तितकंच लोकप्रिय नाव. १९८८ साली ‘बिवी हो तो एैसी’ या चित्रपटातून सलमानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तो छोटेखानी भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाच्या यशानंतर १९८९ मध्ये त्याला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून झळकण्याची संधी मिळाली. मिळालेल्या या संधीचं सोन करत सलमानने त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळविला. त्यानंतर ‘साजन’ (१९९१), ‘हम आपके हैं कौन..’! (१९९४), ‘करण अर्जुन’ (१९९५), ‘जुडवा’ (१९९७), ‘प्यार किया तो डरना क्या’ (१९९८), ‘बीवी नं. १’ (१९९९) या १९९०च्या दशकात गाजलेल्या चित्रपटांत त्याने अभिनय केला. त्याच्या याच अभिनयशैलीमुळे आज तो बॉलिवूडमधला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे तो काही चित्रपटांमध्ये कॅमिओ रोलमध्येही झळकला आहे.चित्रपटातील मुख्य भूमिकांप्रमाणेच त्याचे कॅमिओ रोलही गाजले आहेत. किंबहुना त्याच्या या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमुळेच तो आज कॅमिओचा बादशहा ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

१. कुछ कुछ होता है –
अभिनेता शाहरुख खान,राणी मुखर्जी आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटामध्ये सलमानची खास उपस्थिती पाहायला मिळाली. हा चित्रपट मैत्री,प्रेम यावर भाष्य करणारा असून यामध्ये प्रेमाचा त्रिकोण दाखविण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये सलमानने ‘अमन’ ही व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकेमध्ये सलमान शांत पण तितकाच प्रेमळ दाखविण्यात आला आहे.

२. ओम शांती ओम –
या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकले आहेत. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटातील एका गाण्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. या गाण्यामध्ये सलमानही काळी काळासाठी झळकला होता.

३. सन ऑफ सरदार –
अजय देवगण आणि संजय दत्त यांचा चित्रपट सन ऑफ सरदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरला होता. या चित्रपटामध्ये सलमान एका पठाणच्या भूमिकेमध्ये दिसून आला होता. या चित्रपटातही तो कॅमिओ रोलमध्ये झळकला होता. मात्र त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं होतं.

४. यमला पगला दिवाना फिर से –
‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटाचा पुढील भाग ‘यमला पगला दिवाना फिरसे’ या चित्रपटात सलमान खान झळकला होता. या चित्रपटात त्याने ‘मस्ताना’ ही व्यक्तीरेखा साकारली होती.
५. जुडवा २-
सलमान खानचा जुडवा या चित्रपटाचा रिमेक ‘जुडवा २ ‘हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं असून वरुण धवन झळकला होता. या चित्रपटात सलमान झळकला आहे.

६. तीस मार खां –
तीस मार खां या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका झळकला होता. या चित्रपटातील ‘वल्लाह रे वल्लाह’ या गाण्यामध्ये सलमान खान झळकला आहे.

७. अजब प्रेम की गजब कहानी –
अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात सलमान झळकला होता. त्याच्या लहानशा भूमिकेनेही प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

८. झीरो –
शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला ‘झीरो’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि सलमान कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा एकत्र आले. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये सलमान आणि शाहरुखने ठेका धरला होता.

९. सांवरिया –
सांवरिया या चित्रपटातून रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सलमानने इमान ही छोटेखानी व्यक्तीरेखा साकारली होती.

१०. लय भारी-
अभिनेता रितेश देशमुखचा मराठी चित्रपट ‘लय भारी’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात सलमानने भाऊ ही व्यक्तीरेखा साकारली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 12:45 pm

Web Title: 10 bollywood movies salman khan king of cameos
Next Stories
1 पडद्यावरील कथा सत्यात; अभिनंदनच्या वडिलांच्या आयुष्यातील नकोसा योगायोग
2 १२ वर्षांनी शाहरुख-अक्षय पडद्यावर एकत्र झळकणार?
3 Video : अंबानींच्या सुनेसोबत संगीत कार्यक्रमात आमिर खानने धरला ठेका
Just Now!
X