News Flash

लग्नात नवरदेवाचा प्रताप पाहून अमिताभ बच्चन यांना हसू अनावर

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. त्यातही ते ट्विटरवर नेहमी काही ना काही ट्विट करतच असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी आधी नवरदेवाला हार घालते. त्यानंतर नवरदेवाची हार घालण्याची वेळ येते तेव्हा तो नवरीला हार न घालता तिच्या बाजूला उभ्या असणाऱ्या मुलीलाच हार घालतो. नवरदेवाची ही कृती पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकीत होतात. या व्हिडिओला बिग बी यांनी शेअर केले. शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हाहाहाहा… मग याचा परिणाम काय झाला?’

दरम्यान, राजस्थानमधील जोधपूर येथे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली होती. त्यांना पाठ आणि मानदुखींमुळे हा त्रास झाला होता. चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेल्या कपड्यांचे वजन जास्त असल्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. इतर कोणतेही गंभीर कारण नसून, त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे जया बच्चन यांनी स्पष्ट केले होते.

बिग बी यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ते ऋषी कपूर यांच्यासोबत १०२ नॉट आऊट सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्यांनी ऋषी यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, जे १०२ वर्षांचे असतात. येत्या ४ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये ऋषी कपूर हे अंड्यातून बाहेर येताना दाखवण्यात आले आहे. तर अमिताभ बच्चन अंड्याच्या बाहेर उभे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:24 pm

Web Title: 102 not out star amitabh bachchan share a funny video on twitter ask a question whats next
Next Stories
1 कतरिनाचा विषय निघताच सलमान म्हणतो….
2 MTV Roadies फेम रघू रामच्या आयुष्यात परतलं प्रेम
3 खोटे निघाले या अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त
Just Now!
X