News Flash

लगानची विशी…

आपला एखादा चित्रपट लोकांना वर्षानुवर्षं स्मरणात रहावा, ही माझी इच्छा होती.

|| रेश्मा राईकवार

‘कलाकारांची फौज सांभाळताना…’

या चित्रपटातील ११ मुख्य कलाकार हे सगळे वेगवेगळ्या अभिनय शैलीचे होते. त्यात परदेशी कलाकारांची अभिनयाची शैली वेगळी होती. या सगळ्यांकडून एकत्रित काम करून घेताना त्यांची संवादफे क, एकमेकांशी संवादाची देवाणघेवाण करतानाचा वेळ, एक के कांमधलं संयोजन या गोष्टींचा समतोल साधणं हे आव्हान होतं. इथे मला माझा अभिनय क्षेत्रातील अनुभव कामी आला. शिवाय, अवधी भाषा असल्याने त्याचंही आव्हान कलाकारांसमोर होतं, असं त्यांनी सांगितलं.

भव्य रुपेरी पडद्यावर जिवंत होणाऱ्या आपल्या कलाकृतीने पाहणाऱ्याच्या मनात घर करावं, वर्ष उलटली तरी ती कलाकृती लोकांच्या स्मरणात रहावी, तिच्याविषयी बोललं जावं-चर्चा होत रहावी, अशी एखादी क लाकृती जन्माला घालावी हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. काही वर्षांपूर्वी ‘लगान’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना अशीच काहीशी भावना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या मनात होती. कित्येकांनी नाकारलेली ही पटकथा अभिनेता आमिरकडे कशी आली? आमिरने कथा ऐकू नही प्रत्यक्षात ‘लगान’ची जुळवाजुळव करण्यात गेलेला काळ, त्याची निर्मिती-दिग्दर्शन-अभिनय, ऑस्करवारी याविषयी आत्तापर्यंत बरंच बोललं गेलं आहे. आणि तरीही ‘लगान’चं स्वप्न प्रत्यक्षात उतरून आज वीस वर्षं पूर्ण झाल्यावरही त्याविषयी बोलायच्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आणि लोकांकडेही आहेत, याचा आनंद गोवारीक र यांना वाटतो.

आपला एखादा चित्रपट लोकांना वर्षानुवर्षं स्मरणात रहावा, ही माझी इच्छा होती. ‘लगान’ हा तो चित्रपट आहे. २००१ मध्ये ज्यांनी हा चित्रपट पाहिला होता, त्यांनी तो आपल्या पुढच्या पिढीलाही आवर्जून दाखवला आणि नवीन पिढीही त्याच्याशी सहज जोडली गेली. मला मोठ्यांबरोबरच अनेक लहान मुलं भेटतात आणि हा चित्रपट आवडला असे सांगतात. लोकांचं एवढं प्रेम या चित्रपटाला मिळतंय, याबद्दल मी कृतज्ञ आहे अशी भावना त्यांनी व्यक्त के ली. ‘लगान’ लोकांना एवढा का भावला असावा?, याबद्दल बोलताना त्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्यं आहेत, पण या चित्रपटाचा कथाविचार हा कालबाह््य होणारा नाही. तो प्रत्येक काळात, प्रत्येक समाजात, प्रत्येक पिढीला लागू ठरतो, असं ते सांगतात. संकट आलं की समाजाच्या भिन्न भिन्न स्तरातील माणसे आपापसातील मतभेद विसरून त्या संकटाशी लढा द्यायला एकत्र येतात, हा त्यातला महत्त्वाचा धागा आहे. संकटात एकत्र येण्याची या कथेतील प्रेरणा आजही तशीच आहे. हा चित्रपट आजच्या काळात घडला असता तर कदाचित त्याच्या मांडणीत किं वा शैलीत बदल घडला असता, पण त्यातला विचार तोच राहिला असता, असं गोवारीकर यांनी सांगितलं. ‘लगान’ आजच्या काळात घडला असता तर दिग्दर्शक म्हणून तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाली असती, असं ते मिश्किलपणे सांगतात. या चित्रपटात जेवढी कलाकारांची गर्दी होती तेवढीच गर्दी यातल्या काही दृश्यांसाठीही सतत जमवायला लागायची. कमीतकमी दहा हजार लोकांची गर्दी चित्रीकरणासाठी लागायची. ही गर्दी आता व्हीएफएक्सच्या साहाय्याने उभी करता येते, असं सांगणाऱ्या गोवारीकरांना या चित्रपटाची पूर्वतयारी आजही ठळकपणे आठवते. एक चित्रपट तयार होतो तेव्हा फक्त दिग्दर्शक उत्तम असून भागत नाही. इथे तर मला माझ्या गोष्टीतलं १८९३ सालचं चंपानेर नावाचं गाव उभं करायचं होतं. आमचे छायाचित्रणकार अनिल मेहता, वेशभूषाकार भानू अथैय्या, कलादिग्दर्शक नितीन देसाई, नृत्यदिग्दर्शिका सरोज खान-राजू खान या सगळ्यांबरोबर सातत्याने झालेल्या चर्चा आणि त्यातून उभं राहिलेलं काम आजही आठवतं, असं ते सांगतात.

‘लगान’मधील क्रिके टचा भाग आजही लोकांना आवडतो. पण क्रिके ट हा त्या कथेचा एक भाग होता, त्यापलीकडे हा चित्रपट त्यातल्या क्रिके टसाठी ओळखला जाऊ नये, असं मला आजही वाटतं असं ते सांगतात. सध्या करोनामुळे चित्रपट व्यवसायाची घडी विस्कळीत झाली आहे. जगावर आलेलं हे मोठं संकट आहे त्यामुळे त्यातून सावरून पुन्हा घडी बसवायला वेळ जावा लागेल. मात्र चित्रपट हे लोकांनी मोठ्या पडद्यावर एकत्रितपणे पाहण्याचं माध्यम आहे आणि त्या आनंदासाठी लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येणारच, असा विश्वाासही ते व्यक्त करतात. अर्थात, ओटीटी या नव्या माध्यमाला त्यांचा विरोध नाही हेही त्यांनी स्पष्ट के ले. अनेक गोष्टी अशा असतात ज्या तीन तासांच्या सिनेमात मांडणं शक्य होत नाही आणि त्यांना मालिके सारखं महिनोन्महिने लांबवताही येत नाही. मालिका आणि चित्रपट यांच्यातील मधला दुवा म्हणजे हा वेबमालिके चा फॉर्मेट आहे असे त्यांना वाटते. वेबमालिके त काहीएक तपशिलात जाऊन आणि काही व्यक्तिरेखांचा विस्तार करत कथा रंगवणं शक्य आहे. या माध्यमाचा अभ्यास के ल्याशिवाय त्यात उतरणं मला शक्य नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांचं नव्या पटकथेवर काम सुरू आहे, त्याबद्दल योग्य वेळी माहिती देईन, असं सांगत त्यांनी या गप्पांचा समारोप के ला.

‘आणि नको तेव्हा ढग आले’

चंपानेर हे दुष्काळी गाव आम्ही भुजमध्ये उभं के लं होतं. दुष्काळी असल्याने आकाश निळंशार असणं ही कथेची गरज होती. जेव्हा आकाशात ढग येतील तेव्हा चित्रीकरण होणार नाही हे आमचं ठरलेलं होतं. त्या दृष्टीनेच तयारी के ली होती. तरीही नको तेव्हा ढग आले आणि चित्रीकरण बंद करावं लागलं होतं. बाकी दिग्दर्शक म्हणून आपल्याला हवं तेव्हा आकाशात ढग येतील आणि दृश्य चित्रित होऊ शकतील असं आपल्याला वाटत असतं. प्रत्यक्षात तसं काही होत नाही. चित्रपटातील शेवटच्या दृश्यात आम्हाला आकाशात काळ्या ढगांची गर्दी दाखवायची होती. क्षितिजावर काळे ढग दिसायला लागतात आणि हळूहळू ते गावकऱ्यांच्या अगदी डोक्यावर येऊन मग पाऊस बरसतो, असं ते दृश्य होतं. अर्थात, थेट क्षितिजावरच काळे ढग वगैरे चित्रीकरण अवघड होतं त्यामुळे त्यासाठी तांत्रिक मदतच घ्यावी लागली.

‘त्यांचे कौतुक वाटते’

प्रत्येक चित्रपटकर्मीची स्वत:ची अशी एक शैली असते. त्याने आपल्या चित्रपटातून इतिहासातील गोष्टी दाखवण्याचा विडाच उचलला असेल तर त्याने ते प्रचंड अभ्यासपूर्वक करायला हवे. आपल्या इतिहासात अनेक गोष्टी-संदर्भ आहेत जे दृक् श्राव्य माध्यमातून लोकांसमोर आलेच पाहिजेत. मराठीत सध्या कितीतरी चांगले ऐतिहासिकपट पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक चित्रपटनिर्मिती करण्यासाठी मोठं आर्थिक गणित लागतं, पण मराठीत कमीत कमी आर्थिक नियोजनात निर्माते-दिग्दर्शक इतक्या सुंदर पद्धतीने ऐतिहासिक चित्रपट बनवतात, मला त्यांची कमाल वाटते.

आठवण भानू अथैय्यांची

त्यांचा अभ्यास आणि काम किती बारकाईने के लं जायचं याची आठवण सांगतो. या चित्रपटासाठी आमची पहिली बैठक झाली, त्यांनी कथा ऐकल्यानंतर १८९० मध्ये क्विन व्हिक्टोरिया यांचे पती वारले होते. त्यांच्याकडे राणीचा दुखवटा असायचा आणि त्यावेळी राणी सफे द किं वा राखाडी कपडे घालत असे त्यामुळे त्यांचा मान म्हणून सगळ्या इंग्लंडमध्ये लोक त्याच रंगाचे कपडे परिधान करत असत, असा संदर्भ सांगितला. चित्रपटातील काळ तीन वर्षांनी पुढे घेतला तर आपल्याला रंग किं वा फु लांच्या पॅटन्र्सचा वापर करता येईल,असे त्यांनी सुचवले. आणि आमच्या क थेचा काळ १८९३ मध्ये सरकला. त्यांनी चंपानेर गावातील लोकांचे कपडेही भुज आणि कच्छमध्ये फिरून, काय काय मिळतं आहे हे शोधून त्यानुसार तयार के ले होते. हा चित्रपट इंग्लंडमध्येही दाखवला गेला तेव्हा त्याचे कौतुक झाले. त्या त्या काळातील इतिहासाचे अचूक तपशील त्यांच्याकडे असायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:00 am

Web Title: 11 main actors in the film acting style acting style of foreign actors director ashutosh gowarikar akp 94
Next Stories
1 जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागली; दबंग खान म्हणाला…
2 “लस घेतली का?”; चाहत्याच्या प्रश्नावर लारा दत्ताचं हटके उत्तर म्हणाली…
3 कैलाश खेर यांनी गायलं ‘गाथा नवनाथांची’ मालिकेचं शीर्षगीत!
Just Now!
X