30 September 2020

News Flash

वर्षाखेर रंगणार ‘१४वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव’

चित्रपट महोत्सव २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान रविंद्र नाट्य मंदिरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

१४वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव

१४वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान रविंद्र नाट्य मंदिरमध्ये (मिनी थिएटर)  आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते आपल्या अनोख्या अभिनयाने हिंदी सिनेमाचे अभिनय दालन समृद्ध करणारी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. महोत्सवात सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’या चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मालिकेचे ५ भाग दाखवण्यात येतील. मोहन आगाशेंना ‘अस्तु’ चित्रपटांतील भूमिकेला यंदाचा श्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्या बद्दल कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरच्या बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे कार्यकर्ते दिलीप बापट यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी १४ डिसेंबरपासून दु.२ ते सायं. ८ पर्यंत रविंद्र नाट्य मंदिरमध्ये सुरु होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 3:14 pm

Web Title: 14th third eye asian film festival in mumbai
Next Stories
1 ‘पिंगा’ आणि ‘डोला रे’ची तुलना टाळा- माधुरी दीक्षित
2 फोर्ब्स यादीत बादशाहा शाहरुख अव्वल स्थानी; संगीतकार अजय-अतुलचाही समावेश
3 अखेर ‘करण-अर्जुन’ एकत्र आले!
Just Now!
X