News Flash

सलमानला भेटण्यासाठी मुंबईत पळून आली १५ वर्षांची मुलगी

भोपाळमधून पळून आली

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी त्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते काय करतील याचा नेम नसतो. सलमानला भेटण्यासाठी घरातून पळून आलेल्या १५ वर्षांच्या मुलीला नुकतंच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या मुलीनं कुंपण ओलांडून सलमानच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारकांनी तिला हटकलं असता चोरमार्गानं तिनं पुन्हा एकदा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अखेर सुरक्षारक्षकांनी पोलिसांना या मुलीची माहिती दिली. चौकशी केली असता ही मुलगी भोपाळमधून त्याला भेटण्यासाठी पळून आल्याचं त्यांना कळलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीनं रविवारी संध्याकाळी मुंबईत येणारी ट्रेन पकडली. मंगळवारी ती मुंबईत पोहोचली. त्यानंतर ती थेट वांद्र्याला सलमान राहत असलेल्या ठिकाणी पोहोचली. ही मुलगी नववीत शिकत आहे. सोमवारी तिच्या पालकांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली. तिला लहानपणापासून सलमान खान आवडायचा. त्याला एकदा भेटण्याची तिची इच्छा होती. अखेर त्याला भेटण्यासाठी तिनं पालकांना न कळवताच मुंबई गाठली.

सलमानच्या इमारतीत तिनं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षारक्षकांनी तिला आत जाऊच दिलं नाही. शेवटी शेजारच्या इमारतीत शिरून तिनं कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. ही बाब तातडीनं सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या नजरेस आणून दिली अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिच्याकडून पोलिसांना आधार कार्ड मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 7:02 pm

Web Title: 15 year old runaway girl scales wall to meet salman khan
Next Stories
1 सुपरहिट ‘बबन’ने गाठला ८.५ कोटींचा पल्ला
2 ही अभिनेत्री म्हणते, ‘मुस्लिम असल्यानेच मुंबईत घर मिळत नाही’
3 अभिनेत्री तब्बूची जोधपूर विमानतळावर छेडछाड
Just Now!
X