News Flash

हृतिकसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार त्याचा बॉडीगार्ड?

हृतिक खूपच चांगला आहे, तो सर्वांचीच काळजी घेतो

हृतिक रोशन

‘मोहेंजोदारो’ या चित्रपटानंतर अभिनेता हृतिक रोशन ‘काबिल’ या चित्रपटातून झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावरही या ट्रेलरला बरीच पसंती मिळाली. हृतिक रोशन सोबतच या चित्रपटामध्ये आणखीन एक अभिनेता दिसणार आहे आणि तो अभिनेता म्हणजे रोनित रॉय. पण इथे लक्ष वेधणारी बाब अशी की, हाच अभिनेता म्हणजे, रोनित रॉय १६ वर्षांपूर्वी हृतिक रोशनचा अंगरक्षक होता अशा चर्चा सध्या रंगत आहेत.

वाचा: हृतिकच्या नावावरून ठेवण्यात आले चित्रपटाचे नाव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोनित रॉय एका सिक्युरिटी एजन्सीचा मालक आहे. त्याची ही एजन्सी विविध कलाकारांना सुरक्षा व्यवस्था पुरवते. अभिनेता हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर रोनितने त्याच्या एजन्सी अंतर्गत हृतिकला सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. याविषयी जेव्हा अभिनेता रोनित रॉयकडे विचारणा करण्यात आली त्यावेळी तो म्हणाला की, ‘मी हृतिकला खूप आधीपासूनच ओळखत आहे आणि तो माझ्या निरिक्षणातच असतो. कारण, माझ्याच सिक्युरिटी एजन्सीची माणसं त्याची सुरक्षा व्यवस्था पाहतात. आमच्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्याच्यासारख्या अभिनेत्यासोबत काम करुन मला फारच छान वाटत आहे’.

वाचा: …म्हणून कंगना- हृतिकच्या वादावर पडणार पडदा

हृतिकबद्दल सांगताना रोनितने त्याचे तोंड भरुन कौतुकही केले. ‘हृतिक एक व्यक्ति म्हणूनही खूपच चांगला आहे. तो नेहमीच सर्वांची काळजी घेतो’, असेही रोनित म्हणाला. दरम्यान आगामी ‘काबिल’ या चित्रपटामध्ये हृतिक रोशन एक अंध व्यक्तिरेखा साकारत आहे. हृतिकसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेत्री यामी गौतमसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश रोशन निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि यामी गौतम व्यकिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता रोनित आणि रोहित रॉय खलनायकी भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2016 7:30 pm

Web Title: 16 years ago ronit roy was hrithik roshan bodyguard
Next Stories
1 अरबाज खानचे नवे ‘अफेअर’
2 ‘ऐ जिंदगी गले लगा ले..’
3 Koffee With Karan Season 5: करण आणि कपिलच्या धम्माल गप्पांसाठी सज्ज व्हा
Just Now!
X