News Flash

1962 द वॉर इन द हिल्स; भारत चीन युद्धाची गौरवगाथा रंगवणारी वेब सीरिज

परश्या अर्थात मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत

डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘1962- द वॉर इन द हिल्स’ ही नवी वेबसीरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. 1962 सालच्या भारत चीन युद्धाची कथा यात दाखवली आहे. 10 भागांची ही मालिका आहे. या मालिकेचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून यात अभय देओल, सुमीत व्यास, माही गिल आणि आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

अभय देओलनं यात मेजर सूरज सिंग ही भूमिका साकारली आहे. तर माही गिल ही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 126 भारतीय सैनिकांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूच्या 3000 सैनिकांशी दिलेला लढा यात दाखवला आहे. आजच या वेबसीरीजचे दहा भाग प्रदर्शित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhay Deol (@abhaydeol)

यात रणांगणावरच्या लढ्यासोबतच या सैनिकांच्या कुटुंबातला, कुटुंबासोबतचा आणि कुटुंबासाठीचा लढाही दाखवला आहे. या सीरीजच्या माध्यमातून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हाही डिजिटल विश्वात प्रवेश केला आहे. यापूर्वी त्याने अभिनेता आकाश ठोसरसोबत ‘एफयू’ या चित्रपटातही काम केलं आहे.

भारताने अनेक चीनी ऍप्सवर सध्या बंदी घातली आहे. चीनी वस्तू वापरायला जनताही काही प्रमाणात विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीन युद्धावेळच्या सत्य घटनेवर आधारीत ही सीरीज प्रेक्षकांच्या मनावर किती राज्य करते हे हळूहळू कळेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 5:53 pm

Web Title: 1962 the war in the hills tells the story of indo china war in 1962 vsk 98
Next Stories
1 नव्या चित्रपटातून परिणीतीचं चाहत्यांना सरप्राईझ
2 बेस्ट किसर म्हणत निया शर्माने केली रवी दुबेची प्रशंसा, पत्नी म्हणाली…
3 ”डराने के लिए नाम ही काफी है”, ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Just Now!
X