05 July 2020

News Flash

१९८३ विश्वविजेत्या संघाच्या मदतीसाठी जेव्हा पुढे आलेल्या लतादीदी

खेळाडूंना पुरस्कारात काही रक्कम देण्यासाठी बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष साळवे यांनी लता दीदींना एक संगीताचा कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २००० सालाआधी सुवर्ण क्षण कोणता, असे कोणी विचारले असते तर आपण अगदी सहज १९८३ साली विश्वचषकावर भारताचे कोरले गेलेले नाव असे सांगतो. कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला नमवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. भारतीय क्रिकेट संघाच्या वाट्याला आलेला हा विजय अनेकांसाठी अनपेक्षित होता. त्यावेळी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने टीममधील खेळाडूंचा सन्मान करायचे ठरवले. या सर्व खेळाडूंना देशाला विश्वचषक मिळवून दिल्याबद्दल सर्वांना पुरस्कार देण्याचे ठरवले. मात्र संस्थेकडे निधीची कमतरता असल्याने हे शक्य होत नव्हते. त्यावेळी क्रिकेट हा खेळ आताइतका मोठा नव्हता तसेच बीसीसीआयही आताइतके श्रीमंत नव्हते.

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी या कामासाठी पुढाकार घेत बीसीसीआयला मदत केली. त्यावेळी भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीबद्दलही फारसे पैसे मिळत नसत. मात्र विश्वचषकावर नाव कोरल्याने केवळ खेळाडूंचेच नाही तर देशाचे नशीब बदलले होते. त्यानिमित्ताने तरी खेळाडूंना जास्तीचे मानधन देणे आवश्यक होते. त्यामुळे खेळाडूंना पुरस्कारात काही रक्कम देण्यासाठी बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष साळवे यांनी लता दीदींना एक संगीताचा कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. क्रिकेटवर मनापासून प्रेम करणाऱ्या लतादीदी यासाठी लगेच तयार झाल्या.

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून २० लाख रुपये रक्कम उभी राहीली. जी रक्कम कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषकावर नाव कोरलेल्या संघातील खेळाडूंना पुरस्काराच्या स्वरुपात देण्यात आली. अशाप्रकारे बीसीसीआयसाठी केवळ क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी कार्यक्रम करणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे, त्यासाठी लतादीदींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यामुळे या खेळाडूंसाठीही लतादीदींकडून मिळालेली ही अनोखी भेट अतिशय महत्त्वाची ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2018 8:20 pm

Web Title: 1983 world cup lata mangeshkar performed for team who performed well and got world cup
Next Stories
1 २०१९ कबड्डी विश्वचषकाचा मान दुबईकडे?
2 आयसीसी महिला टी-२० विश्वचषक: भारतीय महिलांची सलामीची लढत न्यूझीलंडशी
3 धोनीपेक्षा जोस बटलर अधिक सरस !
Just Now!
X