News Flash

‘तारक मेहता..’च्या जेठालालला भेटण्यासाठी मुलांनी काढला घरातून पळ

राजस्थानमध्ये राहणाऱ्या या दोन अल्पवयीन मुलांनी घरातून पळ काढला आणि अभिनेता दिलीप जोशीला भेटण्यासाठी मुंबई गाठली.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'

आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते कशाप्रकारे धडपड करतात याचे बरेच किस्से आपण ऐकतो, पाहतो. मग तो कलाकार बॉलिवूडचा असो किंवा छोट्या पडद्यावरचा. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील लोकप्रिय जेठालालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशीला भेटण्यासाठी दोन मुलांनी घरातून पळ काढला. मूळचे राजस्थानमध्ये राहणाऱ्या या दोन अल्पवयीन मुलांनी जेठालालला भेटण्यासाठी मुंबई गाठली.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आठवी आणि सहावीत शिकणारी ही दोन मुलं चुलत भावंडं आहेत. ४१०० रुपये जमा करून बसने प्रवास करत हे दोघं मुंबईला आले. मुंबईतील पवई इथल्या परिसरात ते दिलीप जोशीच्या घराचा पत्ता विचारत होते. या दोघांचं वागणं संशयास्पद वाटल्याने एका व्यक्तीने पोलिसांनी त्याविषयी कळवलं.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे चाहते असून ते प्रत्येक एपिसोड पाहत असल्याची माहिती या दोन मुलांनी पोलीस चौकशीत दिली. जेठालाल आपल्याला खूप आवडत असून त्याला भेटण्यासाठी आम्ही मुंबईला पळून आलो असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान, दिलीप जोशीची या मुलांशी भेट घडवून आणण्यासाठी ‘तारक मेहता..’च्या टीमशी पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 8:48 pm

Web Title: 2 boys run away from their rajasthan home to meet jethalal of taarak mehta ka ooltah chashmah
Next Stories
1 पु. ल. देशपांडे यांच्या बायोपिकविषयी राज ठाकरे म्हणतात..
2 गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक
3 ‘या’ खास व्यक्तीला सलमान करतो इन्स्टाग्रामवर फॉलो
Just Now!
X