शंभर वर्षांपेक्षा जास्त मोठय़ा असलेल्या चित्रपटसृष्टीत कुठल्या ना कुठल्या मोठय़ा चित्रपटाने वीस वर्षे, पन्नास वर्षांचा टप्पा गाठलेला आहे. तरीही काही चित्रपटांची नावे, त्यांचे हे वर्षांगणिक जुने होत जाणे साजरे करण्यासारखेच असते. असाच प्रकार करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाबाबत म्हणता येईल. सध्या धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा आणि इंडस्ट्रीतही सगळ्यांचा लाडका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचा शुभारंभ करणारा हा चित्रपट होता. त्यामुळे हा चित्रपट सर्वार्थाने करण जोहरसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाची वीस वर्षे पूर्ण होणे हा म्हणूनच त्याच्यासाठी एक मोठा सोहळा ठरला. यानिमित्ताने, चित्रपटातली मुख्य तिकडी शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि खुद्द करण जोहर ही मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र आली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या आधी करण जोहर निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहात होता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आदित्य चोप्रा दिग्दर्शित चित्रपट, या चित्रपटाच्या निमित्ताने करणची शाहरुख खान, काजोल यांच्याशी घट्ट मैत्री जमली होती. मात्र करणपेक्षाही त्याचे वडील यश जोहर यांच्यामुळे आपण ‘कु छ कुछ होता है’ हा चित्रपट स्वीकारला, असं शाहरुखने या वेळी बोलताना सांगितले. शाहरुखने यश जोहर यांच्याबरोबर काम केले होते. त्यांनी ‘डुप्लिकेट’ हा चित्रपट केला, मात्र तो फारसा चालला नाही. अशा अनेक वेगळ्या संकल्पना आणि त्यावरचे चित्रपट यश जोहर यांच्या डोक्यात घोळत असायचे. त्यातले अनेक चित्रपट कधीच कॅ मेऱ्यासमोर येऊ शकले नाहीत. ते चित्रपट यायला हवेत, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. ‘दिलवाले..’च्या वेळी करणशी गप्पा मारताना त्याच्या बोलण्यातून त्याच्याकडे हुशारी आहे, दिग्दर्शनाचे एक तंत्र आहे हे लक्षात आले होते. त्यामुळे करणबरोबर चित्रपट करायची इच्छा यश जोहर यांच्याकडेही आपण बोलून दाखवली होती, असे त्याने सांगितले. अखेर, महेश भट्ट यांच्याबरोबर ‘चाहत’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना करण आपल्याकडे ‘कुछ कुछ होता है’ची पटकथा घेऊन आला. त्या वेळी करण खूप काही सांगण्याच्या प्रयत्नात होता, पण कथेच्या नावाखाली त्याच्याकडे फारसे काही सांगण्यासारखे नव्हते, अशी त्याची थट्टाही शाहरुखने केली. पण अभिनेता म्हणून आजवर आपल्याला कधीच पटकथा हा प्रकार समजलेला नाही. मी नेहमी पटकथेपेक्षा ती लिहिणारा किंवा पडद्यावर आणू पाहणाऱ्या दिग्दर्शकाचे मन समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याला काय सांगायचेय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत ‘कुछ कुछ होता है’ हाही त्यातल्या कथेपेक्षाही करणची हुशारी, त्याच्याबरोबर काम करायची इच्छा अशाच गोष्टींमुळे घेतल्याचे त्याने सांगितले.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

शाहरुखला काही समजले नसले तरी करणची कथा मला मात्र भारीच वाटली होती, असे काजोलने सांगितले. तर राणी मुखर्जी त्या वेळी तुलनेने अगदीच नवीन होती. ‘गुलाम’ आणि ‘राजा की आएगी बारात’नंतर पूर्णपणे ग्लॅमरस आणि शाहरुख खानबरोबर रोमान्स करण्याची संधी देणारा, त्याची नायिका बनवणारा हा पहिलाच चित्रपट होता, असे राणीने सांगितले. या चित्रपटाच्या वेळी आपल्याला सांभाळून घेत, अभिनयाचे बारकावे शिकवल्याबद्दल तिने तिच्या काजोल दीदीचे तिला दीदी असे संबोधतच जाहीर आभार मानले. काजोलनेही त्याच खेळकरपणे राणीचे कौतुक केले. तिने राणीला मदत केली ही गोष्ट तिला मान्य नव्हती. तिच्या मते या चित्रपटातच काय आजवर राणी मुखर्जीने एकच गोष्ट केली नाही. ती म्हणजे तिने कोणाची मदत कधीच घेतली नाही. ती आली. ती माझ्यासमोर, शाहरुख खानसमोर आणि करण जोहरसमोर त्याच विश्वासाने, सहजतेने उभी राहिली, असे सांगत काजोलने तिचे दिलखुलास कौतुक केले.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या वेळी खरे म्हणजे शाहरुख खानला त्याच्या महाविद्यालयीन तरुणाच्या भूमिकेसाठी नाही म्हटले तरी टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याची आठवणही त्यानेच हसत हसत करून दिली. घट्ट टीशर्ट्स, रंगीबेरंगी जॅकेट घालून तो याआधी कधीच चित्रपटात दिसला नव्हता. त्यामुळे आजही त्या गोष्टीसाठी त्याचे हसेच होते. मात्र तरीही हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट होता हेही त्याने मान्य के ले. खरे म्हणजे ‘कुछ कुछ होता है’ दिग्दर्शक म्हणून करण जोहरचे पहिले बाळ. पण नेहमी दुसऱ्यांना बोलते करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या करणने या वेळी आपल्या कलाकारांना चित्रपटाविषयी बोलते केले. स्वत: बोलण्यापेक्षा त्यांना बोलते करण्यातच तो रमला. मात्र या चौघांच्या एकत्र येण्यातून रंगलेल्या आठवणींनी प्रेक्षकांच्याही मनात ‘कुछ कुछ..’ झाले यात शंका नाही.