News Flash

स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात शाहरूखची दमदार एण्ट्री

बॉलीवूडचा किंग खान जेव्हा एखाद्या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन हाताळतो तेव्हा त्या सोहळ्याला अनोखा रंग चढतो याची प्रचिती बुधवारी मुंबईत पार पडलेल्या २१ व्या लाइफ ओके

| January 15, 2015 06:27 am

बॉलीवूडचा किंग खान जेव्हा एखाद्या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन हाताळतो तेव्हा त्या सोहळ्याला अनोखा रंग चढतो याची प्रचिती बुधवारी मुंबईत पार पडलेल्या २१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात आली.
पुरस्कार सोहळ्यात शाहरुखची एण्ट्री एकदम दमदार झाली. शाहरुख येताच एकच जल्लोष झाला. एका सुपरबाईकच्या प्रतिकृतीवरून शाहरुखचे स्टेजवर आगमन झाले आणि सुत्रसंचलनाची जबाबदारी स्विकारल्यापासून अगदी शेवटपर्यंत शाहरुखने उपस्थितांना खिळवून ठेवले. शाहरुखच्या हस्ते यावेळी बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला. रोमांसचा बादशाह शाहरुखने यावेळी हेमा मालिनी यांच्यासाठी ड्रीमगर्ल गाण्यावर खास अदाकारी पेश केली. ड्रीमगर्ल गाण्यावरील शाहरुखचा रोमॅण्टीक अंदाज पाहून हेमा मालिनीही भारवून गेल्या.
screen-srk-hemamalini

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 6:27 am

Web Title: 21st annual life ok screen awards shah rukh khan arrives in style
Next Stories
1 काळवीट शिकार प्रकरणी सलमानला तडाखा
2 स्क्रीन पुरस्कारांवर नवसमांतर चित्रपटांची मोहोर
3 LIVE: ‘२१वा लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार’ – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ‘विट्टी दांडू’
Just Now!
X