News Flash

‘बेफिक्रे’च्या या तीन मिनिटांच्या गाण्यात २५ चुंबनदृश्ये..

या गाण्यातून प्रत्येक प्रेम कथेची सुरुवात ही चुंबनामुळे होते असे सांगण्यात आले आहे.

पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता बॉलीवूड चाहत्यांमध्ये रणवीर आणि वाणीच्या 'फ्रेंच किस'ची चर्चा रंगू लागली आहे.

अभिनेता रणवीर सिंग हा सध्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या गाण्यांमुळे. रणवीरच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडचा बाजीराव या चित्रपटाच्या निमित्ताने कोणत्या नव्या भूमिकेमध्ये रसिकांसमोर येणार आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ते अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लबों का कारोबार’ या गाण्याबद्दल रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लबों का कारोबार’ या गाण्याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. जवळपास तीन मिनिटांसाठी चालणाऱ्या या गाण्यामध्ये विविध जोड्यांना किस करताना दाखविण्यात आले आहे. या गाण्यात एक-दोन नव्हे तर तब्बल पंचवीस किस दाखवण्यात आले आहेत. या गाण्यातून प्रत्येक प्रेम कथेची सुरुवात ही चुंबनामुळे होते असे सांगण्यात आले आहे. या गाण्यात तरुणांबरोबरच वयोवृद्ध आणि लहान मुलांही चुंबन करताना दाखवली आहेत.
‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल आठ वर्षांनंतर अदित्य चोप्रा दिग्दर्शनात सक्रिय झाला आहे. रणवीर सिंग आणि वाणी कपूर या नव्या जोडीसह एक ‘बेफिक्रे’ कथानक आदित्य चोप्रा रसिकांसाठी घेऊन येत आहे.
या चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंगने फार मोहनत घेतली आहे. रणवीरने त्याचा खासगी ट्रेनर लॉयड स्टीवन्ससोबत पॅरिसमध्येही जीममध्ये घाम गाळला. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि त्यातून झळकणारी वाणी व रणवीरची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. असे असतानाच रणवीर मात्र आणखी एका कारणाने सोशल मीडिया गाजवत आहे असेच म्हणावे लागेल. बहुचर्चित ‘बेफिक्रे’ हा चित्रपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर आणि वाणीची ही ‘किसिंग केमिस्ट्री’ रसिकांना कीतपत भावणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 5:37 pm

Web Title: 25 kisses in three minutes in a song from the film befikre
Next Stories
1 …या कारणासाठी पूनम करायची ‘कॉन्ट्रव्हर्सी’
2 आर्चीने शाळा सोडली?
3 ‘देसी गर्ल’चा विदेशी आशियाना..
Just Now!
X