24 January 2019

News Flash

सतीश कौशिक यांनी २५ वर्षांनंतर का मागितली बोनी कपूरची माफी?

कौशिक यांनी केलेल्या या ट्विटनंतर काही युजर्सनी त्यांच्या प्रमाणिकपणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

सतिश कौशिक, बोनी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या कारकिर्दीतील काही चित्रपटांचा उल्लेख करण्यास सांगितलं तर चाहते बऱ्याच प्रसिद्ध चित्रपटांनी नावं घेतात. पण, या अभिनेत्रीच्या कारकिर्दीत काही असेही चित्रपट होते, जे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकले नाहीत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘रुप की रानी चोरों का राजा’. अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नव्हती.

जवळपास ९ कोटींच्या निर्मिती खर्चासह साकारण्यात आलेल्या या चित्रपटाला आता २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने सोशल मीडियावर या चित्रपटाशी निगडीत काही गोष्टींच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यातीलच एक चर्चा होती ती म्हणजे, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या ट्विटची. ज्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी बोनी कपूर यांची माफी मागितल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशाबद्दलच कौशिक यांनी ते ट्विट केल्याचं स्पष्ट झालं. ‘२५ वर्षांपूर्वी हा अपयशी चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, एक दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अधिकच जवळचा आहे. असं असलं तरीही मी दिवंगत श्रीदेवी यांच्या पतीनी म्हणजेच बोनी कपूर यांची माफी मागतो. त्यांनी मला ही संधी दिली होती पण, त्या संधीचं सोनं मला करता आलं नाही’, असं ट्विट करत त्यांनी खंत व्यक्त केली.

कौशिक यांनी केलेल्या या ट्विटनंतर काही युजर्सनी त्यांच्या प्रमाणिकपणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. कोणताही चित्रपट हा चांगला किंवा वाईट नसतो. त्यासाठी खर्चलेल्या प्रयत्नांचच जास्त महत्त्वं असतं, असं ट्विट एका युजरने केलं. तर आपल्याला हा चित्रपट आवडल्याचंही काही युजर्सनी स्पष्ट केलं. नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहून कौशिक यांनीही त्यांना उत्तर देत आपल्या आयुष्यात अपयशही तितकच महत्त्वाचं असून त्याचा स्वीकार करणंही आपल्याला यशाच्याच दिशेने नेतं ही बाब लक्षात आणून दिली.

वाचा : ‘या’ साऊथ सुपरस्टारच्या पुतणीसोबत प्रभासचे लग्न?

First Published on April 17, 2018 2:02 pm

Web Title: 25 years after bollywood movie roop ki rani choron ka raja director satish kaushik apologises to boney kapoor