News Flash

प्रेक्षकांसाठी सुरांची मैफल; ‘एक देश एक राग’ महासोहळा

कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात आकाशवाणीतील भक्ती संगीताने करतात तर काही जण मन:शांती अनुभवण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकतात. रेल्वेने किंवा बसने प्रवास करणारे नोकरदार, वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत असतात. अशाच संगीतप्रेमींसाठी ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम नेहमीच अग्रस्थानी राहिला असून गेल्या २५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सुरांची मैफल सादर करत आहे.

हा यशस्वी रौप्य महोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी ‘सारेगमप एक देश एक राग’ हा कार्यक्रम भेटीला येणार आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहे. तसंच सेलिब्रिटी गेस्ट म्हणून पल्लवी जोशीदेखील उपस्थित असणार आहेत.

या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लिटिल चॅम्प्समधील पंचरत्न अर्थात कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. तसंच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमीत राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचेदेखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत. सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर या दिग्गजांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे.

या कॉन्सर्टमध्ये फक्त आवाजाचे सूरच नाही लागणार तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांचे आवडते विनोदवीर आणि मालिकांमधील कलाकारदेखील असणार आहेत. त्यामुळे ‘सारेगमप एक देश एक राग’ हा मंच लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे. हा विशेष सोहळा रविवार २४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 6:19 pm

Web Title: 25 years of sa re ga ma pa grand celebration of songs ssv 92
Next Stories
1 “मोदींचं भाषण ऐकून प्रेरणा मिळाली”; अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार
2 “माझ्या फ्लॉप चित्रपटांना पटकथा जबाबदार”; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
3 सनी लिओनी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण
Just Now!
X