‘३ इडियट’ हा २००९ सालातला सर्वात हिट चित्रपट ठरला. चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ वर्ष उलटली तरी अजूनही प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट म्हणून तो ओळखला जातो. भारतीय शिक्षण पद्धतीची दुखरी बाजू या चित्रपटानं मांडली होती. आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन, बमन इराणी, करिना कपूर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले होते. याच चित्रपटामुळे आमिर चीनी प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनला . आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचं राजकुमार हिरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘मुन्ना भाई चले अमरिका’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच राजकुमार ‘३ इडियट’ च्या सिक्वलवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. ‘३ इडियट’ चा सिक्वल यावा अशी माझी इच्छा आहे. या चित्रपटाच्या कथानकावर लेखक अभिजित जोशी काम करत आहेत. जेव्हा कथानक पूर्णत्त्वास येईल त्यानंतर लगेच या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू होईल’ असं हिरानी म्हणाले.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
this reason Vijay Chawan wife vibhavari chawan exit the acting field
…म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटानंतर ‘मुन्ना भाई चले अमरिका’ हा चित्रपट येणार होता. दहा वर्षांपूर्वी हिरानी यांनी या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही लाँच केलं होतं. पण या चित्रपटाच्या निर्मितीत सतराशे साठ विघ्नं आली त्यामुळे या चित्रपटाचं चित्रिकरण कधीही सुरू झालं नाही. अखेर ‘संजू’ नंतर या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करण्याचं हिरानी यांनी ठरवलं आहे. त्यामुळे ‘मुन्ना भाई चले अमरिका’ या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झाल्यावर ‘३ इडियट’ च्या चित्रिकरणाला सुरूवात होईल असंही ते म्हणाले. त्यामुळे ‘३ इडियट’ चा सिक्वल येतोय ही प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी त्यासाठी त्यांना काही वर्ष आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की.