05 August 2020

News Flash

“ऐश्वर्या राय बच्चनच माझी आई”; ३२ वर्षीय व्यक्तीचा दावा

"लवकरच आईबरोबर राहण्यासाठी मुंबईत येणार"

ऐश्वर्या राय बच्चन

काही दिवसांपूर्वी एका महिलेने गायिका अनुराधा पौडवाल या आपली आई असल्याचा दावा केला होता. आता पुन्हा एकदा असाच दावा एका ३२ वर्षीय मुलाने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने थेट अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपली आई असल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीने १९८८ रोजी आपला जन्म झाला असल्याचा दावा केला आहे. १९८८ साला ऐश्वर्या केवळ १५ वर्षांची होती.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्याच आपली आई असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव संगीत कुमार असे आहे. एका मुलाखतीमध्ये संगीत कुमारने “ऐश्वर्या राय माझी आई आहे. माझा जन्म १९८८ साली आईव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे (इन विट्रो फर्टिलायझेशनद्वारे) लंडनमध्ये झाला,” असा दावा केला आहे. या व्यक्तीने दोन वर्षापूर्वीही अशापद्धतीने प्रसारमाध्यमांसमोर असा दावा केला होता. ज्या मुलाखतीचा संदर्भ देऊन पुन्हा ही बातमी चर्चेत आली आहे ती मुलाखतही दोन वर्षांपूर्वीची आहे.

केवळ ऐश्वर्या आपली आई असल्याचा दावा करुन संगीत कुमार थांबला नाही तर आपल्याला लहानपणी आजी-आजोबांनी संभाळल्याचा दावाही त्याने केला आहे. “ऐश्वर्या रायच्या पालकांनी मी दोन वर्षांचा होईपर्यंत मला संभाळले. त्यानंतर माझे वडील वेदीवेलू रेड्डी मला विशाखापट्टनमला घेऊन गेले. माझ्या नातेवाईकांनी माझ्या जन्माचे सर्व पुरावे नष्ट केले. आज ती कागदपत्रे उपलब्ध असती तर माझे म्हणणे मी ठापपणे मांडले असते,” असंही संगीत कुमार म्हणाला आहे.

“लवकरच मी आईबरोबर राहण्यासाठी मुंबईमध्ये येणार आहे,” असंही संगीत कुमारने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच केरळमधील तिरुअनंतपुरम येथे राहणाऱ्या करमाला मोडेक्स या महिलेने अनुराधा पौडवाल माझी आई आहे असा दावा केला होता. “मी अवघी चार दिवसांची असताना अनुराधा पौडवाल यांनी मला पोन्नाचन आणि अॅग्नेस या दाम्पत्याला दत्तक दिले. अनुराधा पौडवाल यांनी जर माझा दावा फेटाळला तर मी डीएनए टेस्टसाठीही तयार आहे, ज्यानंतर सगळं काही सिद्ध होईल” असंही करमाला यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:32 pm

Web Title: 32 year old andhra boy claims to be aishwarya rai son scsg 91
Next Stories
1 या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच मोडला ‘बाहुबली’चा विक्रम
2 ८७ वर्षांच्या आजोबांचं ५२ वे ऑस्कर नामांकन
3 हृतिक-सुझानची पहिली भेट आणि ‘कहो ना प्यार है’चं कनेक्शन माहितीये का?
Just Now!
X