26 November 2020

News Flash

Happy Birthday Karan Johar : जाणून घ्या, करणविषयी ‘या’ खास गोष्टी

करण 'क' या अक्षराला लकी मानतो

करण जोहर

बॉलिवूडचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आज (२५ मे) त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक लोकप्रिय चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या करणला आजवर फिल्मफेअरच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना नक्की काय पाहायला आवडेल याची त्याला चांगलीच जाण आहे. मात्र प्रेक्षकांची मन ओळखणाऱ्या करणविषयी फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात करणविषयी काही खास गोष्टी.

१९७६ साली करण जोहरच्या वडीलांनी यश जोहर यांनी धर्मा प्रोडक्शनचा पाया रोवला. यश जोहर यांच्या निधनानंतर या प्रोडक्शन हाऊसची धुरा करण जोहर यांच्याकडे आली. ही जबाबदारी तो व्यस्थित पार पाडत असून या प्रोडक्शन हाऊसमध्ये निर्मिती करण्यात आलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. विशेष म्हणजे प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी पार पाडण्यापूर्वी करणने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक पदाची जबाबदारी पार पाडली होती.

धर्मा प्रोडक्शनअंतर्गत१९८० साली ‘दोस्ताना’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर तुफान लोकप्रियता मिळविली. करणने ‘अग्निपथ’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माई नेम इज खान’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘बार बार देखो’, ‘ऐ दिल है मुश्किल’ सह जवळजवळ ३५ सिनेमांची निर्मिती या प्रोडक्शन हाऊसमध्ये केली आहे.

करण ‘क’ या अक्षराला लकी मानतो त्यामुळेच त्याच्या अनेक चित्रपटांची नावं शक्यतो ‘क’ वरुन असतात.विशेष म्हणजे ‘क’ या शब्दाने सुरुवात असणारे ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा ना कहना’ त्याचे हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले.

दरम्यान, अनेक वेळा करणला त्याच्या सेक्शुअल लाईफवरुन ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळेच त्याने ‘एन अनसुटेबल बॉय’ या नावाने बायोग्राफी लिहीली असून या बायोग्राफीमध्ये त्याने त्याच्या सेक्शुअल लाइफवर खुलेपणाने चर्चा केली आहे. करण जोहरने आपल्या बायोग्राफीमध्ये शाहरुख खानसोबतच्या मैत्रीवर एक चॅप्टर लिहिला आहे. यामध्ये तो शाहरुख आणि त्याच्या नात्याविषयी खुलून बोलला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 11:54 am

Web Title: 47th birthday filmmakers karan johar happy birthday
Next Stories
1 Lok sabha Election 2019 : प्रचारसभांना अनुपस्थित असणारा बॉबी सनी देओल यांच्या विजयाविषयी म्हणतो…
2 सलमान म्हणतो, ‘मैंने प्यार किया’च्या यशाचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना
3 चित्र रंजन : मोदी, मोदी आणि मोदीच!
Just Now!
X