News Flash

५५वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव- २०१८ पुरस्कारांची घोषणा

मराठी चित्रपटांपैकी एकूण ६१ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या

संग्रहित छायाचित्र

५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी ‘इडक’, ‘रेडू’, ‘झिपऱ्या’, ‘नशीबवान’, ‘मंत्र’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘क्षितिज-एक होरायझन’, ‘मुरांबा’ या १० चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीकरीता ‘प्रभो शिवाजी राजा’, ‘कॉपी’, ‘अ ब क’ या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी ‘पिप्सी’, ‘हृदयांतर’, ‘पळशीची पी.टी’ यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६१ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून सुरेश खरे, अरुण म्हात्रे, नरेंद्र पंडीत, अनंत अमेम्बल, केशव पंधारे, विजय कदम, शरद पोळ, नरेंद्र कोंद्रा, अंजली खोबरेकर, शरद सावंत, जाफर सुलतान, अशोक राणे, सतीश रणदिवे आणि कांचन अधिकारी यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार ३० एप्रिल २०१८ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०१८

अंतिम घोषित पारितोषिके तांत्रिक विभाग व बालकलाकार
उत्कृष्ट कला दिग्दर्शन
कै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
विनायक काटकर (झिपऱ्या)
2 उत्कृष्ट छायालेखन- कै. पांडूरंग नाईक पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
अर्चना बोराडे (इडक)
3 उत्कृष्ट संकलन रु. ५०,०००/- व मानचिन्ह
देवेन्द्र मुर्डेश्वर (झिपऱ्या)
4 उत्कृष्ट ध्वनीमुद्रण रु. ५०,०००/- व मानचिन्ह
दिनेश उचील (पल्याडवासी)
5 उत्कृष्ट ध्वनीसंयोजन रु. ५०,०००/- व मानचिन्ह
रसूल पुकुटी, अर्णव दत्ता (क्षितीज-एक होरायन)
6 उत्कृष्ट वेशभूषा रु. ५०,०००/- व मानचिन्ह
प्रकाश निमकर (झिपऱ्या)
7 उत्कृष्ट रंगभूषा रु. ५०,०००/- व मानचिन्ह
श्रीकांत देसाई (रेडू)
8 उत्कृष्ट बालकलाकार कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि रु. 50,000/- व मानचिन्ह
साहिल जोशी (अ ब क), मैथिली पटवर्धन (पिप्सी)

सर्वोत्कृष्ट कथा कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक रु. ५०,०००/- मानचिन्ह
1. देवेंद्रभाऊसाहेब शिंदे (मंत्र)
2. दीपक गावडे (इडक)
3. संजय नवगिरे (रेडू)

उत्कृष्ट पटकथा पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. संजय नवगिरे (रेडू)
2. परेश मोकाशी- मधुगंधा कुलकर्णी (चि आणि चि.सौ.का)
3. संजय जमखिंडी (भेटलीस तू पुन्हा)

उत्कृष्ट संवाद कै. आचार्य अत्रे पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. देवेंद्रभाऊसाहेब शिंदे (मंत्र)
2. वरुण नार्वेकर (मुरांबा)
3.रोहिणी निनावे (हृदयांतर)

उत्कृष्ट गीते कै. माडगूळकर पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. गुरु ठाकूर (गीत- देवाक काळजी रे-रेडू)
2. वैभव जोशी (गीत- भेटते ती अशी- असेही एकदा व्हावे)
3. अश्विनी शेंडे (गीत- जरा जरा टिपूर चांदणे- ती सध्या काय करते)

उत्कृष्ट संगीत कै. अरुण पौडवाल पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. विजय नारायण गावंडे (रेडू)
2. ए.व्ही.प्रफुल्लचंद्र (झाला बोभाटा)
3. हरिषदातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी (मला काहीच प्रॉब्लेम नाही)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. नरेन्द्र भिडे (पिंपळ)
2. विजय नारायण गावंडे (रेडू)
3. नंदकुमार घाणेकर (नशीबवान)

उत्कृष्ट पार्श्वगायक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. अजय गोगावले (गीत- देवाक काळजी रे, रेडू)
2. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र (गीत- झुंजुर मुंजुर पहाटेला, झाला बोभाटा)
3. जावेद अली (गीत- दिसे धूसर धूसर, हुंटाश)

उत्कृष्ट पार्श्वगायिका रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. सावनी शेंडे (गीत- सावरे रंग मे, असेही एकदा व्हावे)
2. शाल्मली खोलगडे (गीत- सोन्याचपख लावून, नशीबवान)
3. आनंदी जोशी (गीत- आलंबाई तारुण्य, ॲट्रासिटी)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. उमेश जाधव (झिपऱ्या)
2. शामक दावर (हृदयांतर)
3. राजेश बिडवे (शेंटिमेंटल)

उत्कृष्ट अभिनेता कै. शाहू मोडक पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह श्री शिवाजी गणेशन पुरस्कार
1. शशांक शेंडे (रेडू)
2. भालचंद्र कदम (नशिबवान)
3. उमेश कामत (असेही एकदा व्हावे)

उत्कष्ट अभिनेत्री कै. स्मिता पाटील पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह
1. छाया कदम (रेडू)
2. तेजश्री प्रधान (असेही एकदा व्हावे)
3. पूजा सावंत (भेटलीस तू पुन्हा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 7:52 pm

Web Title: 55th maharashtra state marathi film festival 2018 nomination
Next Stories
1 वाहतूक कोंडीत अडकलेल्या सोनालीच्या मदतीसाठी धावून आला खालीद
2 कंगना आणि तिच्या भाच्याची मस्ती पाहिली का?
3 Shikari Trailer: ऐन उन्हाळ्यात ‘हिट’ वाढवणारा ‘शिकारी’ चित्रपटाचा ट्रेलर
Just Now!
X