10 April 2020

News Flash

‘६ पॅक बॅण्ड’ झाला शाहरुखचा फॅन

हा तृतीय पंथीयांचा भारतातील पहिलाच बॅण्ड आहे.

बॉलीवूड किंग शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान शाहरुखने ‘६ पॅक बॅण्ड’च्या सदस्यांची भेट घेतली. ‘६ पॅक बॅण्ड’ हा तृतीय पंथीयांचा भारतातील पहिलाच बॅण्ड आहे.
यशराज प्रॉडक्शन हाउसने एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. यात ‘६ पॅक बॅण्ड’च्या सदस्यांचे आगमन होताच शाहरुख त्यांचे मिठी मारून स्वागत करताना दिसतो. त्यानंतर या बॅण्डने सध्या चर्चेत असलेले चित्रपटातील जबरा हे गाणेदेखील म्हटले.
‘६ पॅक बॅण्ड’मध्ये मुंबईतील आणि इतर शहरांतील तृतीय पंथियांचा समावेश आहे. या बॅण्डमध्ये सहभागी होण्यासाठी जवळपास २०० किन्नरांचे ऑडिशन घेण्यात आले होते. या बॅण्डची निर्मिती यशराज फिल्मच्या आशिष पाटील याने केली आहे. तसेच, गायक सोनू निगमने त्यांच्या समर्थनार्थ या बॅण्डसोबत रब दे बंदे या गाण्यात काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 10:37 am

Web Title: 6 pack band turns shah rukh khans fan
टॅग Fan
Next Stories
1 कमाल खान व्हॉट्सअॅपवर मला मुलींचे ‘तसे’ फोटो पाठवायचा- सिद्धार्थ मल्होत्रा
2 ‘का रे दुरावा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप!
3 नाशिकच्या ‘गढीवरच्या पोरी’ला झी गौरवची आठ नामांकने
Just Now!
X