24 January 2020

News Flash

लोकसभा निवडणुकीनंतर होणार जाहीर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी

दरवर्षी एप्रिल महिन्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर होतात.

६६व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावं लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर होणार आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर होतात. पण यंदा लोकसभा निवडणूक असल्याने नावं जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांदरम्यान चित्रपटांना प्रोत्साहन देणाऱ्या राज्याचाही सन्मान केला जातो. मात्र निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकांमध्ये सर्व पक्षांना आणि उमेदवारांना समान संधी मिळणे अपेक्षित असते. अशा वेळी पुरस्कार जाहीर झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, त्यामुळे तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षभरात चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांना दरवर्षी ३ मे रोजी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी पुरस्कार वितरणाची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही.

गेल्या वर्षी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर ‘वीलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला होता. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

First Published on April 24, 2019 4:14 pm

Web Title: 66th national film awards winners to be declared after lok sabha elections 2019
Next Stories
1 धावपटू पी.टी. उषा यांच्या बायोपिकमध्ये कतरिना ?
2 बॉलिवूड नायकांच्या आजवर न ऐकलेल्या ३ कथा
3 मोदींच्या संसारिक कोपरखळीवर ट्विंकलचा टोला, म्हणाली…
Just Now!
X