News Flash

८२ व्या वर्षीय आशा भोसले यांचा ‘तरुण’ आवाज

सुरेश भट यांनी लिहिलेल्या काही अन्य गझल्स आता पुन्हा एकदा आशा भोसले यांनी गायल्या आहेत.

आशा भोसले

कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सुरेश भट यांनी लिहिलेल्या काही अन्य गझल्स आता पुन्हा एकदा आशा भोसले यांनी गायल्या आहेत. संगीतकार मंदार आगाशे ‘८२-मराठी पॉप आल्बम’ असे या ध्वनिफितीचे नाव आहे. यात सुरेश भट यांनी लिहिलेल्या ओठ आसवांचे, बरसून हा असा चंद्र, तोरण, दिवस हे जाती कसे आदी गझलांचा समावेश आहे. या सर्व गझल्स आगाशे यांनी पॉप, रेगे, ब्लुज, रॉक, बॅलाड, सोलच्या साजात संगीतबद्ध केल्या आहेत. ८२ वर्षीय आशा भोसले यांनी ही सर्व गाणी गायली आहेत. या निमित्ताने एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या विषयीची माहिती www.82pop.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 2:31 am

Web Title: 82 marathi pop album by asha bhosle
टॅग : Asha Bhosle
Next Stories
1 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवात ‘जर्मनीचा इलेव्हन ईयर्स’ सवरेत्कृष्ट
2 सलमानच्या ‘सुलतान’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
3 अक्षय आणि ह्रतिकच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर, कोण मारेल बाजी?
Just Now!
X