News Flash

सलमानचा तुरूंगातील मुक्काम वाढणार? जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. सलमानला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना बढती मिळाली आहे. सलमानच्या पूर्ण प्रकरणावर नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा सुनावणी होईल. त्यामुळे

राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल झाले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. यामध्ये सलमान खानच्या जामिनावर सुनावणी करणाऱे आणि शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे.

राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल झाले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. यामध्ये सलमान खानच्या जामिनावर सुनावणी करणाऱे आणि शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. एकाचवेळी इतक्या न्यायाधीशांची बदली केल्याने शनिवारी सलमान खानच्या जामिनावरील सुनावणीवर टांगती तलवार आहे. काळवीटाच्या शिकारीप्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना बढती मिळाली आहे. बिष्णोई समाजाच्या वकिलांच्या मते, राजस्थानमधील न्यायाधीशांची बदली होणे ही नियमित प्रक्रिया आहे. कारण बहुतांश न्यायाधीशांची बदली ही एप्रिल महिन्यातच होत असते. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे जोधपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर के जोशी यांचीही बदली करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात नेहमी न्यायाधीशांची बदली होते. परंतु, एकाचवेळी झालेल्या बदलीमुळे सलमानच्या जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारची रात्रही सलमानला तुरूंगात घालावी लागण्याची शक्यता आहे. कारण न्यायाधीशांच्या बदलीमुळे सलमानच्या पूर्ण प्रकरणावर नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा सुनावणी होईल. त्यामुळे सलमानला आणखी काही काळ तुरूंगातच राहावे लागण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:28 am

Web Title: 87 judges transferred from rajasthan the judge who scheduled to hear salman khans bail plea also transferred
टॅग : Salman Khan
Next Stories
1 ‘सहज’ बनले आणखी अवघड
2 अविश्वास ठरावांवर चर्चा न करताच संसदेचे अधिवेशन स्थगित
3 पत्नीने मागितली कार, पतीने तिची हत्या करून मृतदेहाचे केले १५ तुकडे
Just Now!
X