प्रेक्षकांमधील करोना धास्तीचा फटका

मुंबई : ‘इंदू की जवानी’ या चित्रपटाने आजवर केवळ ९० लाख रुपयांची कमाई केली आहे.  प्रेक्षकांमधील करोनाची धास्ती, निर्मात्यांनी डिजीटल शुल्क भरण्यास दिलेला नकार दिला आहे.  या चित्रपटात कियारा अडवाणी आणि आदित्य सील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘इंदू की जवानी’ ११ डिसेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपटाने सुरूवातीच्या दोन-तीन दिवसात २५ लाख रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे निर्माते टी सिरीज आणि एए फिल्म्स यांनी डिजीटल राईट्सचे शुल्क देण्यास मनाई केल्याने या चित्रपटाचे काही शो रद्द करण्यात आले. त्याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर झाला.

तुलनेत ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ने चांगली कमाई के ली. आता २३ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘वंडर वुमन १९८४’ या हॉलीवूडपटाकडून अपेक्षा आहेत, असे वितरक अंकित चंदीरामानी यांनी सांगितले.

पुढील महिन्यात ‘तुलसीदास ज्युनियर’, ‘टय़ुसडे फ्रायडे’, ‘मॅडम चीफ मिनीस्टर’ हे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

‘करोनाची धास्ती, जाहिरातीचा अभाव यांमुळे ‘इंदू की जवानी’ चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. नव्या वर्षांत ‘राधे’, ‘मैदान’, ‘८३’, ‘सूर्यवंशी’ असे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. तर मराठीत ‘झॉलिवूड’, ‘झिम्मा’ आणि ‘डार्लिग’ हे प्रदर्शनाच्या रांगेत असल्याची माहिती या वेळी सूत्रांनी दिली